आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जबाबदारी स्वीकारून पाकिस्तानचे कायदामंत्री झाहिद यांचा राजीनामा; कायदा दुरुस्तीचा वाद

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानचे कायदामंत्री झाहिद हमीद यांनी राजीनामा दिला आहे. घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तींच्या शपथेमध्ये बदल करावा असा प्रस्ताव झाहिद हमीद यांनी दिला होता. असा बदल करणे म्हणजे ईशनिंदा केल्यासारखे आहे, असे मत कट्टरवादी संघटना तेहरिक- ए-लबैकने मांडले आहे. देशभरात पोलिस आणि कट्टरवाद्यांदरम्यान होत असलेल्या संघर्षाची नैतिक जबाबदारी स्वीकारत झाहिद यांनी राजीनामा दिला. या हिंसा रोखण्यात त्यांना अपयश आले. गेल्या तीन आठवड्यांपासून झाहिद हमीद यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी कट्टरवादी गटाच्या निदर्शकांनी राजधानीत ठिय्या दिला होता. निवडणूक कायदा-२०१७ म्हणजे पैगंबरांच्या आदेशांचे उल्लंघन असल्याचे मत कट्टरवाद्यांनी मांडले आहे.  


झाहिद हमीद हे कायदा आणि संसदीय कामकाजमंत्री होते. आपण स्वेच्छेने आपला राजीनामा पंतप्रधान शाहिद खाकन अब्बासींकडे सुपूर्द केल्याचे त्यांनी सांगितले. झाहिद यांच्या राजीनाम्यानंतर देशभरातील आंदोलने मागे घेण्यात येतील, असे कट्टरवादी संघटनांनी म्हटले होते. सरकारशी त्यांनी अशी बोलणी केली होती. राजधानी इस्लामाबादमध्ये कट्टरवादी आंदोलक आणि सुरक्षा रक्षकांमध्ये झालेल्या संघर्षात ६ जणांचा बळी गेला, तर शेकडो जखमी झाले. 

 
राजीनाम्यानंतर आंदोलन घेतले मागे

रविवारी रात्री उशिरा झाहिद हमीद यांनी राजीनामा सादर केल्याचे पंतप्रधान कार्यालयाच्या सूत्रांनी सांगितले. तेहरिक-ए-खतम-ए-नबूवत, तेहरिक-ए-लबैक या रसूल अल्लाह, सुन्नी तेहरिक पाकिस्तान या संघटनांनी सुयंक्तरीत्या झाहिद यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. राजीनामा सादर झाल्यानंतर आंदोलन मागे घेतले. आता घटनात्मक पदांसाठीची शपथ पूर्वीप्रमाणेच राहणार आहे. तेहरिक-ए-लबैकचे प्रमुख खादीम हुसेन रिझवी यांनी आंदोलन थांबवण्याचे आवाहन केले. लष्करप्रमुख व प्रशासनाशी झालेल्या करारानुसार राजीनामा घेतला आहे.

 

संसदीय समितीने केला होता कायदा 

दरम्यान, हमीद यांनी सांगितले की, निवडणूक कायद्याची निर्मिती संसदीय समितीने केली होती. या समितीत सर्वच राजकीय पक्षांचे सदस्य होते. आंदोलक आणि सरकारदरम्यान झालेल्या करारानुसार आंदोलकांवर कोणतीही कायदेशीर कारवाई करण्यात येणार नाही. लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांनी मध्यस्थी केल्याने मोठा संघर्ष टळल्याचे माध्यमांनी म्हटले आहे.

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, माध्यमांवर कट्टरवादी संघटनांची नाराजी...

बातम्या आणखी आहेत...