आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लख्वीच्या सुटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान, लाहोर हायकोर्टाच्या आदेशाने सुटका

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील सरकारने मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड झकी-उर-रहेमान लख्वी याच्या सुटकेला सुप्रीम कोर्टात आव्हान दिले आहे. त्याअगोदर नऊ एप्रिलला लाहोर उच्च न्यायालयाने सुरक्षेच्या कारणास्तव ताब्यात घेण्याची पंजाब सरकारची सबब फेटाळली होती.

सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेत पंजाब प्रांत सरकारने आपली भूमिका मांडली. लख्वीच्या विरोधातील गुप्तचर यंत्रणेकडे उपलब्ध असलेले संवेदनशील दस्तऐवज उच्च न्यायालयासमोर मांडण्यात आले होते. त्यानंतर न्यायमूर्ती मोहंमद अन्वर उल हक यांनी लख्वीला ताब्यात ठेवण्याच्या आदेशाला फेटाळून लावले होते. सुटका केल्यामुळे सरकारसमोर समस्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे मुंबई हल्ल्याशी संबंधित खटल्यावरही परिणाम होऊ शकतो. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीची तारीख निश्चित केलेली नाही.

लख्वीने आपल्या चौथ्या तसेच एक महिन्याच्या नजरबंदीला १४ मार्च रोजी लाहोर उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. त्यावर उच्च न्यायालयाने तत्काळ सुटकेचे आदेश दिले होते. हा आदेश निराशाजनक असल्याची प्रतिक्रिया भारताने दिली होती, परंतु त्यावर पाकिस्तानने उलट भारतालाच त्यासाठी दोषी धरले होते. अमेरिका, फ्रान्स, इस्रायलनेदेखील त्या सुटकेवर टीका केली.