आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pakistans Scientist Aq Khan Said Dr. Kalam Was Just An Ordinary Scientist

कलाम हे सामान्य शास्त्रज्ञ होते, पाकचे बदनाम शास्त्रज्ञ ए.क्यू. खान बरळले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मिसाईल मॅन गमावल्याच्या दुःखात बुडालेल्या भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम पाकिस्तानचे बदनान अणु शास्त्रज्ञ ए.क्यू. खान यांनी केले आहे. कलाम इतर शास्त्रज्ञांप्रमाणेच एक सामान्य शास्त्रज्ञ होते, असे खान बरळले आहेत.

कलामांचा अपमान
बीबीसीला दिलेल्या एका मुलाखतीत पाकचे शास्त्रज्ञ अब्दुल कदीर खान म्हणाले, भारताचा मिसाईल प्रोग्राम रशियाच्या मदतीने सुरू होता आणि कलामांचे त्यात काहीही विशेष योगदान नव्हते. मला वाटते भारताच्या सॅटेलाईट आणि मिसाईल टेक्नॉलॉजी किंवा अॅस्ट्रओ फिजिक्समध्येही कलाम यांचे काही मोठे योगदान नाही, असे म्हणत खान यांनी कलामांचा अपमान केला.

मुस्लिम असल्याने बनवले राष्ट्रपती
खान म्हणाले की, 2002 मध्ये भाजपने कलाम यांना राष्ट्रपती बनवण्याचे एकच कारण होते, ते म्हणजे कलाम हे मुस्लिम होते. मु्स्लिम मते मिळवण्यासाठी भाजपने हा डाव खेळला होता असे खान म्हणाले.

कोण आहेत एक्यू खान
खान यांना पाकिस्तानच्या न्युक्लिअर प्रोग्रामचे जनक (father of Pakistan's nuclear program) असे म्हटले जाते. पण जगात खान यांना न्युक्लिअर टेक्नॉलॉजी विकणारा बदनाम शास्त्रज्ञ आणि दलाल म्हटले जाते. खानला 2004 मध्ये पाकिस्तान सरकारने नजरकैदेत ठेवले होते. त्यापूर्वी खानने नॉर्थ कोरिया, इराण आणि लिबियाला न्युक्लियर टेक्नॉलॉजी विकल्याचे एका टिव्ही मुलाखतीत मान्य केले होते. त्यानंतर अमेरिकेने पाकिस्तानला खानला त्यांच्या ताब्यात देण्याची मागणी केली होती. पण तसे झाले नाही. पाकिस्तानचे तत्कालीन मुख्यमंत्री परवेज मुशर्रफ यांनी तर खानला देशद्रोहीदेखिल घोषित केले होते. पण गिलानी सरकारने 2009 मध्ये खानची सुटका केली होती. त्यावर खान जर देशातील धोकादायक देशांना आण्विक तंत्रज्ञान देऊ शकतात तर ते दहशतवादी संघटनांना मदतही करू शकतात असे अमेरिकेने म्हटले होते. त्यानंतर खान यांनी एक राजकीय पक्षही सुरू केला, पण त्यांना यश मिळाले नाही. सध्या ते कराचीमध्ये राहतात.