आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय सीमेवरच असेल फोकस : पाक संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाजवा यांच्या नियुक्तीसह पाकिस्तानने हे जणू स्पष्टच केले आहे की, त्यांची लष्करी रणनीती धोरणे बदलणार नाहीत. जशीच्या तशीच राहतील, त्यांचा फोकस भारतीय सीमेवरच राहील. तथापि, अमेरिकेने त्यांना दहशतवादाविरोधी मोहिमेवर लक्ष देण्याचा सल्ला दिला.

पाकिस्तानातील सध्याचे लष्कर प्रमुख राहिल शरीफ मंगळवारी सेवानिवृत्त झाले. त्यांनी सोमवारी पंतप्रधान नवाझ शरीफ व राष्ट्रपती ममनून हुसैन यांची भेट घेतली. दरम्यान संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी सांगितले की, देशाच्या लष्करी धोरणात कुठलाही बदल झालेला नसून, आमचा फोकस पूर्वीप्रमाणेच पूर्वेकडील सीमेवरच राहील. पाक माध्यमांनुसार कमर जावेद बाजवा यांना धोरणाप्रमाणे नियमाप्रमाणे बढती देऊन लष्कर प्रमुख बनविले आहे.

२० वर्षांत पहिल्यांदाच नाही वाढला कार्यकाळ : राहिल शरीफ (२०१३-१६) गेल्या २० वर्षांतील असे पहिले लष्करप्रमुख आहेत, जे आपला कार्यकाळ झाल्यानंतर त्वरित सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या पहिले जहांगीर करामात (१९९६-९८) हे कार्यकाळ वाढवल्याविनाच सेवानिवृत्त झाले होते. तथापी, परवेझ मुशर्रफ (१९९८- २००७) यांनी मात्र सत्ता पालटवून ते राष्ट्रपती झाले होते. तेच अश्फाक कयानी (२००७-१३) यांचा कार्यकाळ वाढविला गेला होता. ट्विटरवरील ट्रेंड झालेले जनरल राहिल शरीफ निवृत्त होण्यापूर्वी प्रचंड लोकप्रिय राहिले आहेत.
बातम्या आणखी आहेत...