आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या अलिशान महालात राहायचा हुकुमशहा सद्दाम हुसेन, पाहा PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सद्दाम हुसेनचा अल-फॉ महल. - Divya Marathi
सद्दाम हुसेनचा अल-फॉ महल.
इंटरनॅशनल डेस्क- इराकचा दिवंगत माजी हुकुमशहा सद्दाम हुसेन 16 जुलै 1979 रोजी राष्ट्राध्यक्ष झाला होता. सद्दामने इराकवर सुमारे 24 वर्षे राज्य केले. या हुकुमशहाने आपल्या शासन काळात आपल्या ऐशो-आरामची संपूर्ण व्यवस्था करून ठेवली होती. तसेच देशभर त्याने आपल्यासाठी अनेक महल बांधले होते. सरकारच्या ताब्यात सर्व महल...
 
- आपल्या 24 वर्षांच्या शासन काळात सद्दाम हुसेनने पूर्ण देशात अनेक भव्य महाल उभारले. 
- काही कागदपत्रांमध्‍ये यांची संख्‍या 80 ते 100 पर्यंत असल्याचा उल्लेख आहे. 
- यातील बहुतेक महाल खाडीच्या युध्‍दानंतरची आहेत. 
- हे महाल सद्दामच्या शासनकाळात सर्व प्रमुख शहरांमध्‍ये आहे. 
- यात फक्त हुकुमशहा व त्याचे कुटुंबातील सदस्य नव्हे तर मित्र व प्रेयसीही राहत होते. 
- सद्दामच्या शासन पाडल्यानंतर अमेरिकेच्या सैन्याने काही महाल आपल्या कब्जात घेतले होते. 
- दुसरीकडे इतर महालांवर इराकच्या नागरिकांनी कब्जा केला होता. 
- आता सर्व महाल इराक सरकारच्या कब्जात आहे. यातील काही पर्यटन स्थळात बदलवण्‍यात आले आहे. 
- तर काही महल पाडले आहेत किंवा विकण्‍यात आले आहेत.

32 स्क्वेअर किमीत आठ महाल-

- अमेरिकेच्या कागदपत्रांच्या यादीत सद्दामचे महाल व इमारतींचा उल्लेख आहे. 
- यादीनुसार, सद्दामच्या आठ प्रमुख म‍हालांविषयी सांगितले आहे. 
- या महालांच्या कंपाऊंडमध्‍ये एक हजारांपेक्षा जास्त इमारती आहेत. 
- कंपाऊंडचा पूर्ण भाग 32 स्क्वेअर किलोमीटरचा आहे. 
- यात लक्झरी मॅन्शन, बंगले, कार्यालयीन संकुले, भांडारगृह आणि गॅरेज आदींचा समावेश आहे. 
- या महालांचे वास्तुरचनापासून स्थळापर्यंत सर्वकाही अप्रतिम आहे.
 
क्रूर होता सद्दाम हुसेन-
 
- दोन दशकांपर्यंत इराकचे राष्‍ट्राध्‍यक्ष असलेल्या सद्दाम हुसेन यांचा जन्म 1937 मध्‍ये बगदादच्या उत्तरेला असलेल्या तिकरितमध्‍ये झाला. - सद्दाम यांनी 1980 मध्‍ये नव्या इस्लामिक क्रांतीचा प्रभाव कमी करण्‍यासाठी इराणच्या पश्चिमकडील सीमेलगत आपली सेना उतरवली होती. 
- यामुळे आठ वर्षे चाललेल्या युध्‍दात लाखो लोकांना जीव गमवावे लागले. या दरम्यान जुलै 1982 मध्‍ये सद्दाम यांच्यावर आत्मघाती हल्ला झाला. 
- यानंतर त्यांनी शिया बहुल दुजैल गावातील 148 लोकांची हत्या घडवून आणली होती.

पुढील स्लाईड्स पाहा सद्दाम हुसेनच्या आलिशान महालांचे फोटोज...