आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

झरदारी यांच्या वाढदिवसावर कार्यकर्त्यांचा बहिष्कार, बिलावल भुत्तोंकडून आशा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रावळपिंडी - पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आसिफ अली झरदारी यांचा रविवारी वाढदिवस होता. मात्र, यानिमित्त पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रमात केवळ डझनभर कार्यकर्ते सहभागी झाले होते. झरदारी यांच्या पाकिस्तान पीपल्स पार्टीच्या(पीपीपी) कार्यकर्त्यांनी त्यावर बहिष्कार टाकला होता.
पक्षाचे एक ज्येष्ठ कार्यकर्ते मजहर हुसेन म्हणाले, आम्हाला बोलावण्यात आले नव्हते. झरदारी यांना आम्ही नेते मानत नाही. त्यामुळे बोलावले असते तरीही गेलो नसतो. मजहर २७ डिसेंबर २००८ रोजीच्या बॉम्बस्फोटावेळी बेनझीर यांच्यासोबत होते व ते जखमीही झाले होते. त्या बॉम्बस्फोटात बेनझीर यांचा मृत्यू झाला होता. मजहर म्हणाले, पक्ष कार्यकर्त्यांना बिलावलकडून आशा आहे. झुल्फिकार अली भुत्तो आणि बेनझीर भुत्तोंच्या पीपीपीला तेच तारू शकतील. सध्याच्या नेतृत्वाने नेता आणि कार्यकर्त्यांमध्ये दरी निर्माण केली आहे. अन्य एक कार्यकर्ता सलीम म्हणाला, पक्ष कार्यालय केवळ वाढदिवस साजरा करण्याचे ठिकाण झाले आहे.