आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुशर्रफ बरळला... म्हणे मी लष्कर-हाफिज यांचा समर्थक, PAK ने काश्मिरमध्ये कारवाई करावी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परवेज मुशर्रफ - Divya Marathi
परवेज मुशर्रफ

इस्लामाबाद - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती परवेज मुशर्रफ सोमवारी म्हणाले की, माझा लष्कर ए तैय्यबाला पाठिंबा आहे. दहशतवादी हाफिज सईदही मला आवडतो. मुशर्रफचे म्हणणे आहे की, काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून कारवाईचे कायम समर्थन करायला हवे. गेल्याच आठवड्यात हाफिजला नजरकैदेतून मुक्त करण्यात आले आहे.

 

लष्करही माझे फॅन...
- एएनआय या वृत्तसंस्थेनुसार पाकच्या एका न्यूजवर बोलतांना सांगितले की, मला माहितीये की लष्करही माझे, तर मी त्यांचा फॅन आहे. जमात-उल-दावा ही संघटनाही माझ्यावर प्रेम करते.
- मला हाफिज सईदही आवडतो. हाफिजला मी भेटलेलो आहे. मी नेहमी काश्मिरमध्ये पाकिस्तानकडून कारवाईचे समर्थन केले आहे. काश्मिरमध्ये भारतीय लष्कराचा जोर कमी करायचा आहे.
- लष्कराकडे मोठा फौजफाटा असून भारताने अमेरिकेच्या सहकार्याने पाकला दहशतवादी राष्ट्र म्हणून घोषित केले आहे.

 

23 नोव्हेंबरला मुक्त करण्यात आले हाफिजला
- हाफिज सईदला 10 महिन्याच्या नजरकैदेतून 23 नोव्हेंबरला मुक्त करण्यात आले होते. त्यानंतर त्याने केक कापून सुटकेचा उत्सव साजरा केला होता. 

 

कोण आहे हाफिज सईद? 
- हाफिज सईद दहशतवादी संघटना जमात-उल-दावाचा म्होरक्या आहे. दुसऱ्या क्रमांकाच्या दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैय्यबाचा सहसंस्थापक आहे. भारतामध्ये अनेक दहशतवादी कारवायांमध्ये दोन्ही संघटना अनेकवेळा दोषी आढळून आल्या आहेत. हाफिजसाठी एक कोटी डॉलरचे रोख रकमेचे बक्षीस घोषित करण्यात आले होते. हाफिज विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती.
- पाकिस्तान सरकारने हाफिजचे नाव एक्झिट कंट्रोल लिस्टमध्ये समाविष्ट केले आहे. त्यामुळे पाकिस्तान सोडून हाफिज जाऊ शकत नाही. पाकिस्ताननेसुद्धा हाफिजला दहशतवादी मानले आहे. पंजाब प्रांतात सईदच्या नावे अँटी टेररिझ्म अॅक्टच्या चौथ्या कलमात समावेशाची घोषणा करण्यात आली आहे.
- हाफिज सईद मुंबईच्या 26 नोव्हेंबरच्या हल्ल्याचा मास्टरमाइंड आहे. या हल्ल्यात 6 अमेरिकन नागरिकांसह 166 लोक मारले गेले होते.
- भारताने मुंबई हल्ल्याचा तपास करण्याची मागणी पाकिस्तानकडे सातत्याने केली आहे. ही मागणी पुढेही होऊ शकते. यासंदर्भात भारताने जगासमारे याचे पुरावे सादर केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...