आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pathankot Attack Affected The Dialogue Process: Nawaz Sharif

PAK पीएम म्‍हणाले- पठाणकोट हल्‍ल्यानंतर भारत पाकमधील चर्चा मंदावली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकचे पंतप्रधान नवाझ शरीफ म्‍हणाले की, भारत-पाकिस्तानमधील संबंध अलिकडे सुधारत आहेत. पठाणकोट हल्‍ल्यामुळे दोन्‍ही देशातील चर्चा मंदावली होती असेही ते म्‍हणाले.
केव्‍हा झाला पठाणकोट हल्‍ला आणि काय होते पाक कनेक्शन...
- 2 जानेवारीला सकाळी 6 वाजता पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पठाणकोट एअरबेसवर हल्‍ला केला होता.
- या हल्‍ल्यात 7 जवान शहीद झाले होते.
- 36 तास एनकाउंटर आणि तीन दिवस कॉम्बिंग ऑपरेशन चालू होते.
- या हल्‍ल्याचा मास्टरमाइंड जॅश-ए-मोहम्मदचा चीफ मौलाना मसूद अजहर आहे.
- अजहरला 1999 मध्‍ये कंधार प्लेन हायजॅक केसमध्‍ये प्रवाशांच्‍या बदल्‍यात सोडण्‍यात आले.
- भारताने दहशतवाद्यांचे कॉल डिटेल्‍स आणि त्‍यांच्‍याकडून पाक बनावटीचे साहित्‍य घेतले होते.
- दहशतवाद्यांकडून घेतलेले सर्व साहित्‍य पुरावा म्‍हणून शेजारील देशांना पाठवले आहे.
- पाक मीडियाचा दावा आहे की, मसूद अजहरला ताब्‍यात घेण्‍यात आले आहे.
- मात्र, माध्‍यमांचा हा दावा पाकने फेटाळून लावला आहे.
- जॅश ए-मोहम्मद (जेईएम) वर क्रिमिनल केस दाखल झाली आहे किंवा नाही, पाकने हे अजून कन्फर्म केले नाही.
- 25 जानेवारीला यूएस प्रेसिडेंट बराक ओबामा यांनी पाकसोबत दहशतवाद विरोधातील कारवाईसंदर्भात चर्चा केली.
- त्‍यानंतर शरीफ म्‍हणाले की, भारताने पठाणकोट संदर्भातील नवीन पूरावे सादर केले आहेत.
- "पाकिस्तान हल्‍लेखोरांना कायद्याच्‍या कचाट्यात पकडण्‍यासाठी प्रकरणाचा तपास करत आहे."