इस्लामाबाद - पठाणकोट हल्ल्याप्रकरणी पाकिस्तानमध्ये दीड महिन्यानंतर गुरूवारी एक एफआयआर दाखल करण्यात आली. मात्र, पाकिस्तानच्या विशेष तपास पथकाने शिफारस करूनही जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख आणि हल्ल्याचा मास्टरमाइंड अजहरचे यामध्ये नाव नाही.
कोण आहे मसूद अजहर आणि कुणी दाखल केली एफआयआर...
- 1999 मधील 'इंडियन एअरलाइन्स'च्या आयसी-814 विमानाच्या अपहरणाचा सूत्रधार अजहरचा भाऊ रौफ हाच होता.
- 155 प्रवाशांना सोडण्याच्या मोबदल्यात 1994 मध्ये श्रीनगर येथे अटक करण्यात आलेल्या अजहर आणि त्याच्या दोन साथीदारांना सोडण्याची मागणी त्या वेळी करण्यात आली होती.
- भारताने ही मागणी मान्य केली होती. त्यानंतर अजहरने 2000 मध्ये जैशे महंमद संघटना सुरू करून आपल्या दहशतवादी कारवाया सुरू ठेवल्या.
- 2001 मध्ये भारतीय संसदेवर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधारही अजहरच होता.
- पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमधील पंजाब प्रांतातील गुजरांवालामध्ये काउंटर टेररिज्म डिपार्टमेंटने (सीटीडी) पठाणकोट हल्ल्याप्रकरणी अज्ञात लोकांविरुद्ध गुरुवारी एफआयआर दाखल केली.
- पठाणकोट हल्ल्यानंतर कारवाईच्या दृष्टीने पाकिस्तानने ऑफिशियली उचलले हे पहिले पाऊल आहे.
- या हल्ल्यामागील सूत्र हे पाकिस्तानातीलच आहेत, हे पाकिस्तानने मान्य केल्याचे यातून स्पष्ट झाले.
पुढील स्लाइडवर वाचा, पाकिस्तानच्या एसआयटीने काय म्हटले होते अहवालात...