आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAKमध्ये भारतीय टीव्ही-रेडिओ प्रसारणावर उद्यापासून बंदी, परवाना रद्द करण्याची धमकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारतात पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घालण्याची लोकभावना वाढीस लागत असताना पाकिस्तानमध्ये भारतीय टीव्ही चॅनल आणि रेडिओ पूर्णपणे बॅन करण्याचा अधिकृत निर्णय घेण्यात आला आहे. पाकिस्तान इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने शुक्रवारपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरु केली आहे. अथॉरिटीने इशारा दिला आहे की या निर्णयाचे उल्लंघन करणाऱ्यांचे लायसन्स कोणत्याही नोटीसशिवाय रद्द केले जाईल.
- न्यूज एजन्सीच्या वृत्तानुसार, पाकिस्तानच्या इलेक्ट्रॉनिक मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने (PEMRA) म्हटले आहे, 'सरकारच्या सल्ल्यानुसार भारतीय प्रसारण पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.'
- ही बंदी 21 ऑक्टोबर दुपारी 3 वाजतापासून लागू होईल. यानंतर जर कोणी रेडिओ किंवा टीव्ही चॅनल बंदीचे उल्लंघन करताना आढळले तर त्यांचा परवाना तत्काळ रद्द केला जाईल.
- मीडिया रेग्युलेटरी अथॉरिटीने हा इशारा बुधवारी एक निवेदन जारी करुन दिला. त्यात म्हटले आहे, 'पाकिस्तानमधील केबल आणि रेडिओवर ऑन एअर होणाऱ्या सर्व भारतीय प्रसारणावर ही बंदी लागू आहे.'
पाकिस्तानने का उचलले हे पाऊल
- जम्मू-काश्मीरमधील उरी येथे 18 सप्टेंबर रोजी भारतीय लष्करी तळावर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात 18 जवान शहीद झाले होते. तेव्हापासून दोन्ही देशांतील संबंध खराब झाले होते.
- त्यानंतर भारतीय लष्कराने 28 व 29 सप्टेंबर दरम्यानच्या रात्री पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राइक केले होते. यात 40 दहशतवादी मारले गेले होते. त्याचे 7 लॉन्चिंग पॅड उद्ध्वस्त केले गेले होते.
- या दोन्ही घटनानंतर भारतात पाकिस्तानी कलाकारांना मोठा विरोध होत आहे. सीमेपलिकडून सुरु असलेला दहशतवाद पूर्णपणे संपुष्टात येत नाही तपोर्यंत पाक कलाकारांवर बंदीची मागणी होत आहे.
बातम्या आणखी आहेत...