आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बंदी हटताच परवेज मुशर्रफ देशाबाहेर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची/दुबई - सरकारकडून परवानगी मिळाल्याच्या काही तासांतच पाकिस्तानचे माजी लष्करप्रमुख परवेज मुशर्रफ यांनी उपचारासाठी दुबई गाठली आहे. सध्या त्यांच्याविरोधात देशद्रोहासोबतच अन्य काही खटले सुरू आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर सरकारने त्यांच्यावर विदेशात जाण्याची २०१४ मध्ये घातलेली बंदी उठवली.

मुशर्रफ भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी अमिरातच्या विमानाने दुबईला रवाना झाले. रवाना होण्यापूर्वी ते म्हणाले, मी कमांडो असून आपल्या देशावर मला प्रेम आहे. मी काही आठवड्यांत किंवा महिन्यांतच मायदेशी परतेल, नंतर देशाच्या विकासात सहकार्य करेल आणि राजकारणात सक्रिय भूमिकाही बजावेल. ७२ वर्षीय मुशर्रफ यांना दीर्घकाळापासून पाठीच्या कण्याचा त्रास आहे. २००८ च्या निवडणुकीनंतर मुशर्रफ यांच्यावर महाभियोग लावण्यात आला होता. त्यानंतर ते काही काळ दुबईत गेले होते. २०१३ मध्ये मायदेशी परतले. त्यानंतर त्यांच्यावर अनेक प्रकारचे खटले दाखल झाले.
बातम्या आणखी आहेत...