आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्‍तान: तपासनाक्यावरील पोलिसांवर बॉम्बहल्ला; 11 ठार, 20 जखमी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर -पाकिस्तानच्या वायव्य प्रांतातील तपासनाक्यावर पोलिसांवर निशाणा साधत घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात किमान ११ नागरिक ठार, तर २० जखमी झाले. खैबर आदिवासी क्षेत्रातील जामरूद भागात पोलिस अधिकारी नवाब शाह यांच्या गाडीजवळ हा स्फोट झाला. हल्लेखोराने स्फोटाने भरलेल्या मोटारसायकलचा स्फोट घडवून आणला.

खैबर पाकिस्तान आदिवासी भाग आहे. अफगाण सीमेलगतच्या या भागात पाक सुरक्षा दल तालिबानविरुद्ध लढत आहे. गेल्या काही वर्षांत आदिवासी क्षेत्रातील दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईदरम्यान मोठ्या प्रमाणात स्फोट आणि आत्मघातकी हल्ले होत आहेत.
पत्रकाराचा मृत्यू : त्या परिसरात उभा पत्रकार महबूब शाह आफ्रिदी याचाही या हल्ल्यात मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार, स्फोटानंतर कारला आग लागली. प्रतिबंधित तहरिक-ए-तालिबानने (टीटीपी) हल्ल्याची जबाबदारी स्वीकारल्याचे वृत्त आहे. टीटीपी पथकाने खासादार तपासनाक्यावर यशस्वी हल्ला चढवल्याचे संघटनेचा प्रवक्ता मोहंमद खोरासानीने पत्रकात म्हटले आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, हल्‍ल्यानंतरचे फोटो..