आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कराचीमध्ये याच घरात राहतो दाऊद, बिलावरही आहे याच घराचा पत्ता

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - दाऊदचा कराचीमध्ये असतलेला बंगला मोइन पैलेस क्लिफ्टन (इनसेट दाऊद) - Divya Marathi
फाइल फोटो - दाऊदचा कराचीमध्ये असतलेला बंगला मोइन पैलेस क्लिफ्टन (इनसेट दाऊद)
कराची - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीम पाकिस्तानातच लपलेला असल्याचे ठोस पुरावे भारताच्या हाती लागले आहेत. एका इंग्रजी वृत्तपत्राने त्याबाबत खुलासा केला आहे. भारत आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची नियोजित बैठक झाल्यास भारत हे पुरावे पाकला सोपवणार आहे.

या वृत्तातील दाव्यानुसार दाऊद कुटुंबासह कराचीतील पॉश एरिया क्लिफ्टनमध्ये राहत आहे. काही काळापूर्वी भारताच्या एका अधिकाऱ्यानेही तसा दावा केला होता. त्यानंतर मोइन पॅलेस क्लिफ्टनचे काही फोटोही झळकले होते. दरम्यान भारताकडे यावेळी आणखी ठोस पुरावे आहेत. त्याच्या ज्या बंगल्याचा उल्लेख होत आहे, त्याच बंगल्याचे वीजबिलही मिळाले आहे.

पुढील स्लाइड्सवर पाहा, दाऊदची पाकिस्तानात असलेली इतर मालमत्ता...