आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PK 661 विमान अपघात प्रकरण, इंजिनामध्ये बिघाडामळे अपघात, प्राथमिक तपासातून दावा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पेशावर - पाकिस्तानातील विमान अपघातामागे इंजिनातील बिघाड कारणीभूत असल्याचा दावा प्राथमिक तपासातून करण्यात आला आहे. दोनपैकी एका इंजिनात बिघाड झाल्याने ते कोसळले होते.

पीके ६६१ विमानाला बुधवारी अपघात झाला होता. त्यात सर्वच्या सर्व ४७ जण खाक झाले. त्यात पॉप गायक जुनैद जमशेद व त्यांच्या पत्नीचाही समावेश आहे. हे विमान इस्लामाबादकडे जात होते. विमानात ३१ पुरुष, ९ महिला व दोन लहान मुले होती. पाच विमान कर्मचारी होते. विमानाने उड्डाण घेतल्याच्या काही वेळातच वैमानिकाने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. परंतु त्यानंतर मात्र वैमानिकाशी संपर्क होऊ शकला नव्हता. विमान कोसळण्यापूर्वी वैमानिकाने विमान तातडीने उतरवण्यासाठी बेनझीर भुट्टाे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला होता. परंतु काही वेळातच हे विमान रडारवरून दिसेनासे झाले होते. सायंकाळी सव्वाचारच्या सुमारास हा फोन आला होता.
बातम्या आणखी आहेत...