आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाधव यांना तत्काळ फाशी देण्याचा अाग्रह, पाक सुप्रीम कोर्टात याचिका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद-  कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेवर आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती आणली आहे. मात्र, शनिवारी पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात एका याचिकेद्वारे जाधव यांना त्वरित फाशी देण्याची मागणी करण्यात आली. जाधव यांनी स्वत: गुन्हा कबुल केला आहे.
 
त्यामुळे फाशी देण्यात उशीर करू नये, अशी अॅड. मुजम्मल यांच्या याचिकेत मागणी केली अाहे. त्यांच्यानुसार, जाधव यांनी शिक्षेविरुद्ध अपीलही केले नाही, त्यामुळे शिक्षेला उशीर कशासाठी?  त्यांना पाकच्या कायद्यानुसार राजकीय संपर्क देण्यात आला नाही. आंतरराष्ट्रीय कोर्टाचा निकाल पाकिस्तानसाठी बंधनकारक नाही, असेही याचिकेत म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...