आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुशर्रफ म्हणाले - अडचण भाजप नाही मोदी आहे, ते पाक - मुस्लिम विरोधी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर - पाकिस्तानचे माजी राष्ट्रपती जनरल परवेझ मुशर्रफ यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदी मुस्लिम आणि पाकिस्तान द्वेषी असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मुशर्रफ म्हणाले, 'अडचण भाजपात नाही, मोदीत आहे. मोदींपासून पाकिस्तान आणि मुस्लिमांना धोका आहे.' गेल्या आठवड्यात एका टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी कुख्यात दहशतवादी बिन लादेन पाकिस्तानचा हिरो असल्याचे म्हटले होते. त्यासोबतच लष्कर-ए-तोएबा पाकिस्तानचीच निर्मीती असल्याचे ते म्हणाले होते.

काय म्हणाले मुशर्रफ
पाकिस्तानी न्यूज चॅनल 92 ला दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ म्हणाले, भारतात असा पंतप्रधान आला आहे जो पाकिस्तान आणि मुस्लिमांच्या विरोधात आहे. भाजप किंवा काँग्रेस असा यात पक्षांचा काही संबंध नाही. याआधी अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते ते भाजपचेच होते मात्र एक उत्तम व्यक्तीमत्व. प्रश्न सोडवण्यासाठी ते गंभीर असत आणि त्यांना त्यात स्वारस्य होते. त्यामुळे मला असे म्हणण्यात काहीच खेद वाटत नाही की प्रॉब्लेम स्वतः मोदी आहेत.

भारतात मुस्लिमांना भविष्य नाही
उत्तर प्रदेशातील दादरी येथे गोमांस घरात ठेवल्याच्या संशयावरुन सप्टेंबरमध्ये अखलाक नावाच्या एका व्यक्तीची ठेचून हत्या करण्यात आली होती, त्यावरही मुशर्रफ बोलले. ते म्हणाले, 'भारतात गोहत्येच्या अफवेवरुन एका व्यक्तीला मारुन टाकण्यात आले. ही कोणती मानवता झाली? ज्यांनी कोणी हे केले असेल त्यांना दहशतवादी ठरविले पाहिजे. असे जर होत राहिले तर भारतात मुस्लिमांचे भविष्य चांगले दिसत नाही.'

काश्मिरात दहशतवादी कारवायात सहभागी होते पाकिस्तान
गेल्या आठवड्या दिलेल्या मुलाखतीत मुशर्रफ यांनी लष्कर आणि दहशतवाद्यांना समर्थन दिल्याचे मान्य केले होते. ते म्हणाले होते, '1990 मध्ये काश्मिरमध्ये दहशतवादी कारवाया करणाऱ्या ग्रुप्सला पाकिस्तानचे समर्थन होते. एवढेच नाही त्यांनी कुख्यात दहशतवादी ज्याला अमेरिकेने पाकिस्तानात घुसून मारले तो ओसामा बिन लादेन, पाकिस्तानचा हिरो असल्याचे सांगितले होते. '