आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नरेंद्र मोदींचे वक्तव्य द्वेष पसरवण्यासाठी’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बांगलादेशमध्ये पाकिस्तानबाबत केलेले वक्तव्य पाकविरुद्ध द्वेष पसरवण्याचा आणि पाकिस्तान-बांगलादेशातील संबंध बिघडवण्याचा प्रयत्न असल्याची प्रतिक्रिया पाकिस्तानकडून बुधवारी देण्यात आली.

पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्रविषयक सल्लागार सरताज अजीज यांनी संसदेमध्ये सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. १९७१ मध्ये पूर्व पाकिस्तानला तोडण्यात भारताने भूमिका बजावली आणि दहशतवादाला प्रोत्साहन देऊन अस्थिरता पसरवल्याचा आरोप त्यांनी केला. पाकिस्तानविरुद्ध द्वेष पसरवण्याच्या उद्देशाने मोदी यांनी बांगलादेशाची निवड करणे खेदजनक आहे. पाकिस्तान आणि बांगलादेशमधील संबंध बिघडवणे हा त्यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.सुरक्षा परिषदेतील भारताच्या कायम सदस्यत्वाला विरोध अजीज यांनी संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत कायम सदस्यत्व मिळवण्याच्या मागणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. भारताने संयुक्त राष्ट्रातील जम्मू व काश्मीरबाबतच्या प्रस्तावाचे उल्लंघन केल्याचा आरोप त्यांनी केला. मिआन रझा रब्बानी यांनीही मोदींच्या वक्तव्याचा निषेध केला.