आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोशल मीडियातून ईशनिंदा, दोषींना कडक शिक्षा करा, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- सोशल मीडियातून ईशनिंदा खपवून घेतली जाणार नाही. अशा प्रकारची ऑनलाइन सामग्री तत्काळ काढून टाकण्यात यावी. त्याचबरोबर दोषींना कडक शिक्षा करावी, असे आदेश पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी दिले आहेत.  

अशा प्रकारच्या कृतीमुळे देशातील नागरिकांच्या भावना दुखावल्या जातात. त्यामुळेच दोषींना शोधून त्यांना कठोर शिक्षा करावी, असे अादेश शरीफ यांनी केंद्रीय गृहमंत्री चौधरी निसार अली खान यांना दिले आहेत. गेल्या आठवड्यात इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती शौकत सिद्दिकी यांनी गृहमंत्र्यांच्या विरोधात यासंबंधी आदेश बजावले होते. फेसबुकवर कथित इस्लामविरोधी आक्षेपार्ह आशय प्रसिद्ध झाला होता. त्यावर आक्षेप घेण्यात आला आहे.  ईश्वर निंदेची जबाबदारी निश्चित करताना जबाबदार घटकांकडून ईश्वर निंदा प्रतिबंधक कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी का होत नाही, याचाही तपास केला जावा.

संवेदनशील विषय
पाकिस्तानात ईश्वर निंदा हा अतिशय संवेदनशील विषय आहे. अशा प्रकारची कृती किंवा वक्तव्य करणाऱ्या व्यक्ती कट्टरवाद्यांचे सहज लक्ष्य ठरले आहेत. पाकिस्तानातील पंजाबचे माजी राज्यपाल सलमान तासीर यांची अशाच प्रकरणात हत्या झाली होती. पाकिस्तानात हा कायदा १९८० च्या दशकात अस्तित्वात आला.  तत्कालीन लष्करशहा झिया उल हक यांनी हा कायदा आणला होता.
बातम्या आणखी आहेत...