आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • PM Nawaz Sharif Shows Support For Kashmiris\' Freedom Struggle

पाक PM शरीफ यांचे फुटीरवादी नेत्‍या अंद्राबीला पत्र, काश्‍मीर भूमिकेचे कौतुक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी फुटीरवादी पार्टी दुख्तरान-ए-मिल्लतची प्रमुख असिया अंद्राबी हिला पत्र लिहीले आहे. काश्मीरप्रश्‍नी पाकची जबाबदारी काय आहे हे माहित आहे, यापुढेही आंतरराष्ट्रीय पातळीवर हा मुद्दा उपस्थित करणार आहे, असे शरीफ यांनी पत्रात म्‍हटले आहे. जम्‍मू - काश्‍मीर प्रश्‍नावर जनमत संग्रह हा एकमेव उपाय असल्‍याचेही त्‍यांचे मत आहे. पाक पीएम शरीफ यांनी पत्रात काश्‍मीर प्रश्‍नावर आसियाच्‍या भूमिकेचेही कौतुक केले आहे.
शरीफ यांनी काय लिहीले ?
>रेडियो पाकिस्तानच्‍या बातमीनुसार, आसियाला लिहीलेल्‍या पत्रात शरीफ म्‍हणाले, "पाकिस्तान काश्‍मीरचा प्रश्‍न केवळ सिमावाद मानत नाही. तर, 1947 च्‍या फाळणीनंतर निर्माण झालेला वाद मानते. पाकिस्तान काश्‍मीरच्‍या लोकांना निर्णय घेण्‍याचा पूर्ण अधिकार देत आहे. पाक त्‍यांच्‍या सोबत आहे." असेही ते म्‍हणाले.
>नवाझ यांनी लिहीले की, "काश्मीरप्रश्‍नी तुमची कल्‍पना आणि भावना पाहून तुमचे धन्यवाद. अल्लाह मलाही अपेक्षांच्‍या पूर्तीसाठी शक्‍ती देवो."
>शरीफने भारत दुतोंडी बोलत असल्‍याचा आरोप केला आहे. ते म्‍हणाले, भारताने वर्ल्ड कम्युनिटीला वचन दिले होते की, काश्‍मीरी लोकांना त्‍यांचे राजकीय भविष्‍य ठरवण्‍याचा पूर्ण अधिकार राहील. पण या वचनावरून भारताने माघार घेतली आहे.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, संबंधित फोटो..