आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जास्त वेतन, बढती हवी? मग वेळेवर नमाज अदा करा, पीओकेच्या सरन्यायाधीशांचा कर्मचाऱ्यांना आदेश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुजफ्फराबाद - जास्त वेतन हवे असेल तर न्यायालयात तसेच न्यायालयाबाहेरही नियमितपणे नमाज अदा करा, असा आदेश पाकव्याप्त काश्मीरच्या (पीओके) सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी आपल्या कर्मचाऱ्यांना दिला आहे. नवे सरन्यायाधीश इब्राहिम झिया यांनी शनिवारी पदभार स्वीकारला. झिया यांनी स्वत: शपथ घेतल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांनाही शपथ दिली. पाकिस्तानच्या एखाद्या न्यायालयात असा प्रकार पहिल्यांदाच झाला आहे. ‘द एक्स्प्रेस ट्रिब्युन’ने हे वृत्त दिले आहे. 

न्यायमूर्ती इब्राहिम पाकव्याप्त काश्मीरचे १२ वे सरन्यायाधीश आहेत. त्यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, आता बढती आणि वेतनवाढ या दोन्ही गोष्टी कर्मचाऱ्यांनी वेळेवर आणि नियमित नमाज अदा केल्यावरच अवलंबून राहतील. या आदेशानुसार न्यायालयातील सर्व कर्मचाऱ्यांना नमाज अदा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मी स्वत: नमाजचे नेतृत्व करेन, असे न्यायमूर्ती झिया यांनी म्हटले आहे.  कोण नमाज अदा करत आहे आणि कोण नाही हे पाहण्यासाठी गुप्तपणे प्रत्येकावर नजर ठेवली जाईल, पण कर्मचारी न्यायालयाबाहेर नियमितपणे नमाज अदा करतात की नाही हे पाहण्यासाठी कोणती यंत्रणा वापरणार आहेत हे मात्र झिया यांनी स्पष्ट केले नाही.  

कामही प्रामाणिकपणे करा  
सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळावा म्हणून कर्मचाऱ्यांनी समर्पण, प्रामाणिकपणा आणि नियमितपणे काम करावे, असे निर्देशही झिया यांनी दिले.
 
बातम्या आणखी आहेत...