आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्शल लॉ लागू करा; पाकच्‍या 13 शहरांमध्‍ये रात्रीतून झळकले पोस्टर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - मार्शल लॉ लागू करावा आणि टेक्नोक्रॅट्सचे सरकार स्थापन करावे, अशी मागणी लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांच्याकडे करणारे पोस्टर पाकिस्तानच्या १३ शहरांत लागले आहे. मंगळवारी लाहोर, कराची, पेशावर, क्वेटा, रावळपिंडी आणि पेशावरसह १३ शहरांत हे पोस्टर दिसले.

‘मूव्ह ऑन पाकिस्तान’ या लहान पक्षातर्फे हे पोस्टर लावण्यात आले. त्यात म्हटले आहे की, लष्करप्रमुख जनरल राहिल शरीफ यांनी आपल्या निवृत्तीच्या योजनेबाबत फेरविचार करावा. जनरल शरीफ नोव्हेंबरमध्ये निवृत्त होणार आहेत. एका बॅनरवर, ‘जुन्या गोष्टी जाऊ द्या, देवासाठी आता या’ असे लिहिले आहे. पक्षाच्या केंद्रीय मुख्य संघटकाच्या हवाल्याने ‘डॉन’ने लिहिले आहे की, हा पक्ष देशात मार्शल लॉ लागू करू इच्छितो. राजकीय नेते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे आता टेक्नोक्रॅट्सचे सरकार स्थापन व्हावे. त्या सरकारचे नेतृत्व स्वत: जनरल शरीफ यांनी करावे. या मुद्द्यावर लष्कराच्या इंटर सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने चुप्पी साधली आहे, पण विश्लेषक आमिर राणा यांच्या मते काहीतरी खिचडी शिजत आहे.
तीन वर्षांपूर्वी झाली होती या पक्षाची नोंदणी
फैसलाबादमधील उद्योगपती मुहंमद कामरान हे मूव्ह ऑन पाकिस्तान पक्षाचे प्रमुख आहेत. फैसलाबाद, सरगोधा, लाहोरमध्ये त्यांच्या अनेक शाळा आणि व्यवसाय आहेत. तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या वेळी पक्षाने निवडणूक आयोगाकडे नोंदणी केली होती. पक्षाने पाच महिन्यांपूर्वी म्हटले होते की, लष्कराने सत्ता हाती घ्यावी, असे आम्ही म्हणत नाही, पण त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे आता त्या पक्षाला वाटत आहे.
बातम्या आणखी आहेत...