आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीमंताचा देश ओळख असलेल्या सौदीतही आहेत गरीब लोक, जगताहेत अशी LIFE

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीतील 20 टक्के जनता आजही खूपच हलाखीचे जीवन जगत आहे. - Divya Marathi
सौदीतील 20 टक्के जनता आजही खूपच हलाखीचे जीवन जगत आहे.
इंटरनेशनल डेस्क- सौदी अरेबियाचे नाव जगात श्रीमंत देश म्हणून घेतले जाते. हे सुपर रिच लोकांचे सर्वात मोठा अड्डा मानला जातो. येथे सुपर रिच लोकांची संख्या भले ही जास्त असेल, पण सौदी देशात आजही 20 टक्के जनता खूपच गरिबीचे जीवन जगत आहेत. मात्र, येथील गरिबी जगासमोर कधीच येत नाही. लंडनचा फोटोग्राफर लिन्से एडेरियोने येथील स्लममधील फोटो टिपले आहेत. गरिबी लपवते या देशातील सरकार...
 
- रियादमधील लग्झरी शॉपिंग मॉल्ससोबतच राजधानीतील स्लम्सची लांबच लांब रांग साफ दिसून येते. 
-गरिबी आणि विकास यावर लिहणारे सौदीचे स्कॉलर रोसी बशीर यांच्या माहितीनुसार, येथील देशातील सरकार गरिबी लपवते.
- बशीर यांच्या माहितीनुसार, येथेही लोक अन्नावाचून तडफडतात आणि श्रीमंत लोकांना गरिबांचा त्रास दिसतच नाही.
- सौदी सरकार आपल्या देशातील गरीब जनतेचा मोजकाच व मर्यादित ऑफिशियल डाटा जारी करते. 
- तर, प्रेस रिपोर्ट आणि प्रायवेट संस्थांच्या अहवालानुसार, 20 ते 40 लाखांची लोकसंख्या दर महिन्याला 530 डॉलरपेक्षा कमी पैशात आपले जीवन जगतात.
- सरकारी आकडेवारीनुसार, देशात गरिबी वाढण्याचे कारण हे आहे की, तेथे बेरोजगार तरूणांची संख्या वाढत चालली आहे.
 
जेव्हा स्टेट मीडियाने दाखवली गरिबी-
 
- गार्डियनच्या रिपोर्टनुसार, सौदीत 2002 पर्यंत स्टेट मीडियासाठी गरिबी हा एक असा मुद्दा होता, जो दाखवायला ते कचरायचे. 
- किंग अब्दुल्लाहने जेव्हा देशाची सत्ता हातात घेतली तेव्हा त्यांनी रियादमधील स्लम भागाचा दौरा केला होता. 
- तेव्हा न्यूज कवरेजवर सौदीतील अनेक लोकांनी देशातील गरिबी प्रथमच पाहिली होती. 
- यानंतर प्रिन्स सुल्तान बिन सलमान यांनी देशात गरिबीची समस्या असल्याचे मान्य करत ती दूर करणार असल्याचे म्हटले होते. 
- त्यांनी तीन ते पाच वर्षात इकोनॉमिक डेवलपमेंटद्वारे गरिबी नष्ट करू असे म्हटले होते. 
- सरकारद्वारे कित्येक अब्ज डॉलर दर वर्षी लोकांच्या एज्युकेशन आणि हेल्थकेयरवर खर्च केले जात आहेत. 
- याशिवाय सरकारकडून प्रत्येक महिन्याला पेन्शनसोबतच अन्नधान्य आणि वीज बिले भरली जातात.
 
(नोट- अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सौदी अरेबियाच्या दौ-यावर आहेत. यानिमित्ताने आम्ही तेथील फॅक्ट्स, खास ठिकाणे आणि श्रीमंत लोकांबाबतच्या स्टोरीज करत आहोत.)
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, एडेरियोद्वारे टिपलेले सौदीतील गरीब वस्तीतील फोटोज...
बातम्या आणखी आहेत...