आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत-पाक चर्चा निर्विघ्न पार पडेल; पाकच्या संरक्षण मंत्र्यांना विश्वास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- भारत-पाकिस्तान यांच्यातील सचिवस्तरीय चर्चा निर्विघ्नपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त करतानाच त्यात कोणत्याही दहशतवादी गटाच्या कुरापतींना स्थान मिळणार नाही, असे पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा माेहंमद असिफ यांनी स्पष्ट केले आहे.

असिफ शनिवारी एका टीव्ही वाहिनीशी बोलत होते. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असणाऱ्यांवर ठोस कारवाई केली जाईल. चर्चा निष्फळ होऊ दिली जाणार नाही. काही समाजविघातक तत्त्वांना उभय देशांतील ही चर्चा होऊ नये, असे वाटते.परंतु ते त्यांच्या इराद्यात कदापिही यशस्वी होणार नाहीत, असे असिफ यांनी सांगितले. गेेल्या आठवड्यात पठाणकोट हवाई दलाच्या तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. हे दहशतवादी पाकिस्तानातील असल्याचे पुरावे सापडले आहेत. मौलाना मसूद अझर म्होरक्या असलेल्या जैश-ए-मोहंमद या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला आहे. त्या पार्श्वभूमीवर असिफ म्हणाले, पाकिस्तानने दहशतवाद्यांच्या विरोधात मोठी लष्करी मोहीम सुरू केली आहे. झर्ब-ए-अज्ब नावाची ही मोहीम आहे. त्यात मोठे यश मिळाले आहे. अनेक दहशतवादी संघटनांचा नायनाटदेखील झाला आहे. आगामी काळातही अशा मोहिमा सुरू ठेवण्यात येणार आहेत. अजूनही ही मोहीम सुरू आहे.

हल्ल्याच्या सूत्रधारांवर पाकने कारवाई करावी : अमेरिका
पाकिस्तानने खासगी आणि जाहीरपणे दिलेल्या वचनांची पूर्तता करण्याची वेळ आली आहे. म्हणूनच दहशतवाद्यांच्या विरोधात देशाने भेदभाव न करता कारवाई केली पाहिजे. पठाणकोट हल्ल्याचा कट करणाऱ्यांवरही तातडीने कारवाई केली जायला हवी, असे अमेरिकेने म्हटले आहे. आम्ही तपास करत आहोत. भेदभाव करणार नाही, असे त्यांनी (पाकिस्तानने) जाहीरपणे म्हटले आहे. आता त्यांनी आपल्या शब्दाला जागावे. त्यात विश्वासाचा प्रश्न नाही. दिलेल्या शब्दाशी ते किती प्रामाणिक आहेत, हे आम्हाला पाहायचे आहे, असे अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. ही आव्हानात्मक वेळ आहे, याची जाणीव आम्हाला आहे. परंतु आता कृती करून दाखवली पाहिजे, असे या अधिकाऱ्याने म्हटले आहे. नियोजित बैठकीत काश्मीर मुद्दाही दहशतवादावरून मतभेद नाहीत.

लष्कर आणि सरकार यांच्यात दहशतवाद्यांच्या विरोधातील मोहिमेवरून कसल्याही प्रकारचे मतभेद नसल्याचा दावा संरक्षण मंत्री असिफ यांनी केला आहे. या मुद्द्याला माध्यमांनी अधिक प्रसिद्धी द्यायला हवी, अशी माझी विनंती आहे.

१५ जानेवारी रोजी परराष्ट्र सचिव स्तरीय चर्चा
भारत आणि पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव १५ जानेवारी रोजी भेटतील. पाकिस्तानी संसदेत या मुद्द्यावर विचारलेल्या प्रश्नावर पंतप्रधानांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार सरताज अजिज यांनी शुक्रवारी हे स्पष्ट केले. आगामी बैठकीत दौन्ही देशांचे सचिव सर्वंकष चर्चेसाठी आवश्यक असलेल्या भविष्यातील बैठकांचे ठिकाण, तारीख आणि वेळ निश्चित करतील. काश्मीर हा चर्चेतील महत्त्वाचा मुद्दा राहील, असे अजिज यांनी अगोदरच सांगितले आहे.
बातम्या आणखी आहेत...