आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सद्दामने केली होती हजारो कुर्द लोकांची हत्या, जाणून घ्‍या अशाच निर्दयी हुकुमशहांविषयी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंटरनॅशनल डेस्क- फिलिपाइन्सचे राष्ट्राध्यक्ष रॉड्रिगो दुतेर्ते सध्या विविध कारणाने चर्चेत आहेत व वादात अडकले आहेत. खरं तर दुतेर्ते हे लोकशाही मार्गाने निवडून आले आहेत. मात्र त्यांचा गेल्या वर्षभरातील कारभार पाहता त्यांचा प्रवास हुकुमशहाकडे चालला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. एखाद्या सैनिकाने तीन महिलांवर जरी अत्याचार केला तर मी त्याचा दोष माझ्या माथ्यावर घेईन.  मिंडानाओ या दक्षिणेकडील प्रांतात हिंसाचारानंतर मार्शल लॉ लागू केल्यानंतर सैनिक अत्याचार करत असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी ही टिप्पणी केली.  दुतेर्ते यांच्या या टिप्पणीने अगदी अमेरिकेपासून त्यांना विरोध सुरू झाला आहे.

वायफळ बोलण्याबद्दल अध्यक्ष दुतेर्ते यांची ख्याती आहे. आयएसच्या दहशतवाद्यांनी मिंडानाओच्या मरावा शहरावर कब्जा केला आहे. दक्षिण आशियातील ख्रिश्चन बहुल देश असल्याने इसिस त्याला लक्ष्य करत आहे. या दरम्यान मार्शल लॉ लागू करण्याआधी ते सैनिकांशी चर्चा करत असताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले.
 
दुसरीकडे,  ड्रग्ज व ड्रग्ज माफियाच्या विरोधात छेडलेल्या युद्धामुळे त्यांच्यावर जगभरातून टीका होत आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात रोड्रिगो यांनी फिलीपाईन्सच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे घेतल्यानंतर आतापर्यंत 9000 हून अधिक ड्रग्ज माफियांना मारून टाकले आहे. ड्रग्ज माफियाच्या मर्डरसाठी सरकारकडून आणखी 100 डॉलर बक्षिस म्हणून दिले जाते. सध्या फिलीपाईन्समध्ये रोजच्या रोज ड्रग्स डीलर्सचे मृतदेह रस्त्या-रस्त्यावर व गल्ली गल्लीत दिसत आहेत. त्यामुळे मानवी अधिकाराचे हनन होत असल्याने जगभरातून त्यांच्यावर टीका होत आहे. असे असले तरी जगाने याच्यापेक्षा निर्दयी हुकुमशहांचा काळ पाहिला आहे. यात मग उत्तर कोरियाचे किम जोन्ग इल असो किंवा लीबियाचे हुकुमशहा मुअम्मर गद्दाफी. 
 
पुढील स्लाईड्सद्वारे जाणून घ्‍या, जगभरातील काही क्रूर हुकुमशहांविषयी...
बातम्या आणखी आहेत...