पेशावर - वायव्य पाकिस्तानमधील चरसड्डा जिल्ह्यातील बचा खान विद्यापीठात बुधवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात रसायनशास्त्राचे प्राध्यापक सय्यद हामिद हुसैन मारले गेले. दहशतवाद्यांच्या गोळीची शिकार होण्याआधी प्रा. हामिद यांनी अनेक विद्यार्थ्यांचे प्राण वाचवले. स्वतःच्या पिस्तूलासह ते दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर देत होते. हल्ल्यात 21 जण ठार झाले असून, 50 हून अधिक गंभीर जखमी आहेत.
प्राध्यापकाबद्दल सांगितले प्रत्यक्षदर्शीने
- विद्यापीठातील विद्यार्थी जहूर अहमदने डॉन न्यूजला सांगितले, 'गोळीबाराचा आवाज सुरु झाल्यानंतर मी हॉस्टेलवरुन निघण्याचा प्रयत्न केला. मात्र रसायनशास्त्राचे प्राध्यापक हामिद यांनी मला बाहेर जाऊ दिले नाही.'
- प्रा. हामिद यांच्या हातात पिस्तूल होती. आम्हाला थांबवण्यापूर्वी त्यांनी एक गोळी झाडली होती. तेव्हाच आम्ही पाहिले, की एक गोळी येऊन त्यांना लागली.
- आम्ही पाहिले की दोन दहशतवादी गोळीबार करत होते. मी आत पळालो.
- त्यानंतर कसातरी मागच्या भिंतीवरुन उडी मारण्यात यशस्वी झालो. तोपर्यंत प्रा. हामिद यांनी दहशतवाद्यांना रोखून धरले होते.
- आणखी एका विद्यार्थ्याने टीव्ही चॅनलला सांगितले, आम्ही वर्गात होतो. तेव्हाच गोळीबार सुरु झाला. आम्ही पाहिले की तीन दहशतवादी गोळ्या झाडत होते.
- ते आमच्या डिपार्टमेंटकडे येत होते. तेव्हाच एका विद्यार्थ्याने खिडकीतून उडी टाकली आणि क्लासरुम बाहेर पडला.
- तोपर्यंत दहशतवादी रजिस्ट्रार ऑफिसमध्ये घुसले होते. आम्ही सगळे तिथून पळून गेलो.
- या विद्यार्थ्यानेही सांगितले, की रसायनशास्त्राचे प्राध्यापक पिस्तूल घेऊन दहशतवाद्यांशी मुकाबला करत होते.
हामिद यांनी लिहिले होते सात रिसर्च पेपर
एआरवाय न्यूजच्या वृत्तानुसार, प्रा. हामिद यांचे सात रिसर्च पेपर प्रसिद्ध झाले आहेत.
- ते ऑर्गेनिक केमेस्ट्री तज्ज्ञ होते.
पुढील स्लाइडमध्ये, विद्यार्थ्यांनी प्रा. हामिद यांना सोशल मीडियावर दिली श्रद्धांजली