आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Properties Of Dawood Ibrahim In Different Countries

दुबईत आहे दाऊदचे हे फाइव्ह स्टार हॉटेल, या देशांमध्येही आहे Property

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - दाऊदने इकबाल मिर्चीबरोबर इंपेरिअल सूट्स नावाने फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले होते. (इनसेट दाऊद) - Divya Marathi
फाइल फोटो - दाऊदने इकबाल मिर्चीबरोबर इंपेरिअल सूट्स नावाने फाइव्ह स्टार हॉटेल सुरू केले होते. (इनसेट दाऊद)
पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या संयुक्त अरब अमिरात (यूएई) च्या दौऱ्यावर आहेत. आज दोन्ही देशांमध्ये औपचारिक चर्चा होणार आहे. या चर्चेत दाऊदच्या संपत्तीवर जप्ती आणण्याच्या मुद्यावर चर्चा केली जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. दाऊदने त्याचा राइट हँड इकबाल मिर्चीबरोबर अनेक बेनामी प्रॉपर्टींची खरेदी केली होती. मिर्चीच्या मृत्यूनंतर मात्र आता दाऊदच या प्रॉपर्टीची जबाबदारी सांभाळत आहे.

भारताशिवाय अनेक देशांमध्ये प्रॉपर्टी
काही काळापूर्वी इंटरपोलला दाऊद आणि इकबाल मिर्चीच्या भारतासह पाकिस्तान, दुबई, तुर्कस्तान, सिंगापूर, सायप्रस, स्पेन, मोरक्को मध्येही प्रॉपर्टी असल्याची माहिती मिळाली होती. इकबाल मिर्चीने दाऊदच्या मदतीने फाइव्ह स्टार इंपिरियल सूट्स नावाने हॉटेल सुरू केले होते. ते अजूनही सुरू आहे. तसेच ब्रिटनच्या पॉश हॉर्नचर्च एसेक्समध्ये इकबाल मिर्चीने बंगला खरेदी केला होता.

टॅक्समध्ये सूट आणि दुसऱ्या नावाने जमवला पैसा
इकबाल मिर्चीने 5 देशांमध्ये दाऊदचा पैसा पोहोचवला असे म्हटले जाते. हा पैसा केवळ दाऊदची भारतातील संपत्ती विकून आलेला नव्हता तर ड्रग्जच्या व्यवसायातील हजारो कोटींचाही त्यात समावेश होता. त्या पैशातून सिंगापूरमध्ये संपत्ती खरेदी करण्यात आल्या. सायप्रसमध्ये टॅक्समध्ये सूट मिळत असल्याने दाऊदने येथे बनावट नावांनी खाती उघडली.
पुढील स्लाइड्सवर पाहा, दाऊदने खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचे PHOTOS