आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PoK मध्ये लोक रस्त्यावर; स्वातंत्र्यासाठी घोषणाबाजी, पाकिस्तानी फौजा हटवण्याची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुझफ्फराबाद - पाकव्याप्त काश्मीरमध्ये (पीओके) पुन्हा एकदा पाकिस्तानविरोधात घोषणाबाजी सुरु झाली आहे. गुरुवारी लोक स्वातंत्र्यासाठी रस्त्यावर उतरले आणि पाकिस्तानी फौजा हटविण्याची मागणी करीत आहेत. पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज करुन त्यांना हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला.
आंदोलक म्हणाले - पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही
- पाकव्याप्त काश्मीरमधील लोकांना पाकिस्तानपासून स्वातंत्र्य हवे आहे. एक आंदोलक म्हणाला, 'आमच्या भागातून पाकिस्तानी फौजा हटविल्या पाहिजे. आम्हाला स्वातंत्र्य हवे आहे. आम्ही हे अत्याचार आणखी सहन करणार नाही.'
- लोकांनी पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांचाही समाचार घेतला. ते म्हणाले,'पाकिस्तान स्वतःला सांभाळू शकत नाही. नवाज शरीफ जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात गेले तरी राहिल शरीफ सावलीसारखा त्यांच्या मागे असतो.'
- पाकिस्तानपासून स्वातंत्र्य मागत असलेल्या आंदोलकांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला.
केव्हा-केव्हा झाले आंदोलन
- कोटली भागातील लोक १ आणि २ ऑक्टोबर रोजी आर्मी आणि आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने चालविलेल्या अत्याचारांविरोधात रस्त्यांवर उतरले. लोकांनी नवाज शरीफ यांच्याविरोधातही घोषणाबाजी केली.
- याआधी ३० सप्टेंबर रोजी लोक भारताच्या समर्थनार्थ लोक रस्त्यावर उतरले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारताला मिळणारा मोठा पाठिंबा पाकिस्तानी पोलिस दडपण्याचा प्रयत्न करीत आहे.
- लोकांचा आरोप आहे की पाकिस्तानी फौजा पीओकेमध्ये ह्युमन राइट्सची पायमल्ली करीत आहे. येथे आंदोलन करणाऱ्या लोकांनी भारतात जाण्याची इच्छ्या व्यक्त्याले सांगितले जाते.
- १४ ऑगस्टला गिलगिट-बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानचा विरोध झाला होता. हजारो युवक रस्त्यांवर उतरले होते. त्यांनी पाकिस्तानी लष्कर गो बॅकच्या घोषणा दिल्या होत्या. त्यावेळी ५०० हून अधिक आंदोलकांना अटक झाली होती.
काय आहे पीओके
- काश्मीरचा एक मोठा भाग पाकिस्तानच्या ताब्यात आहे. त्याला पाकव्याप्त काश्मीर (पीओके) म्हटले जाते.
- पाकिस्तानच्या ताब्यातील काश्मीरची राजधानी मुझफ्फराबाद आहे.

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...