आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Protesters Besiege Director Kabir Khan At Karachi Airport Over Anti Pakistan Movie

VIDEO: \'फँटम\'च्या डायरेक्टर विरोधात कराची विमानतळावर घोषणाबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - बॉलिवूडमधील डायरेक्टर कबीर खानला कराची विमानतळावर परत जा, परत जा, शेम शेम अशा घोषणांचा सामना करावा लागला. तो एका सेमिनारमध्ये सहभागी होऊन विमानतळाकडे परतत होता. कबीर कारमधून उतरून विमानतळाकडे जात असताना लोकांनी त्याला घेरले आणि घोषणाबाजी सुरु केली. गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या 'फँटम' वरुन पाकिस्तानी लोकांनी कबीरला विरोध केला.
कबीरला केला प्रश्न - रॉ संबंधी का चित्रपट बनवत नाही
- बुधवारी कबीर खान कराची मधील जिन्ना इंटरनॅशन विमानतळावर पोहोचला तेव्हा दुसऱ्या प्रवाशांनी त्याला गराडा टाकला.
- 'शेम-शेम' आणि 'पाकिस्तान जिंदाबाद'च्या घोषणा ते लोक देऊ लागले. त्यांनी कबीरला विचारले, की भारतीय गुप्तचर संस्था रॉ संबंधी एखादा चित्रपट का बनवत नाही?
- एका आंदोलकाने म्हटले, 'रॉ ने जाधवला येथे पाठवले आणि त्याने शेकडो लोकांना मारले. तुम्ही त्याच्यावर फिल्म का बनवत नाही?'
- एकाने हातात बुट घेऊन कबीरचा पाठलाग केला. त्याने कबीरला इशारा दिला की भारत-पाकिस्तान लष्कराबद्दल कॉन्स्परन्सी करणे बंद कर. मात्र, कबीर खानने आंदोलकांच्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर दिले नाही.
फँटमच्या कोणत्या डायलॉगला होता पाकिस्तानींचा विरोध
- कबीर खान दिग्दर्शित 'बजरंगी भाईजान' चित्रपटाला पाकिस्तानातून चांगला प्रतिसाद मिळाला होता, मात्र अँटी पाकिस्तानी कंटेंट असल्या कारणाराने 'फँटम' आणि 'काबुल एक्स्प्रेस' यांना विरोध झाला होता.
- फँटममधील डायलॉग - 'घर में घुस कर मारेंगे'ला पाकिस्तानातून मोठा विरोध झाला होता.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, या घटनेचा व्हिडिओ....