आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

2 हजार आंदोलकांना हुसकावण्यास पाकिस्तानने उतरवले 8,500 जवान; 6 ठार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामाबाद- पाकिस्तानातील अनेक शहरांत शनिवारी कट्टरवादी आंदोलक आणि सुरक्षा दल यांच्यात ठिकठिकाणी धुमश्चक्री उडाली होती. त्यात एका जवानाचा मृत्यू झाला तर २०० हून जास्त लोक जखमी झाले. राजधानीच्या महामार्गावर शेकडो आंदोलकांनी हिंसक आंदोलन केले. राजधानीत ठाण मांडून बसलेल्या दोन हजार आंदोलकांना हुसकावण्यासाठी ८ हजार ५०० सैनिकांना तैनात करण्यात आले होते. 


इस्लामाबाद उच्च न्यायालयाने शुक्रवारी गृहमंत्री एहसान इक्बाल यांच्याविरोधात न्यायालयाच्या अवमानप्रकरणी नोटीस बजावली होती. राजधानीतील रस्त्यांवरून आंदोलकांना हटवण्यात यावे, असे आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आले होते. परंतु त्यानंतरही कार्यवाही झाली नव्हती. अखेर इक्बाल यांना नोटीस पाठवण्यात आली. त्यानंतर सरकार जागे झाले व त्यांनी राजधानीसह लाहोर व इतर ठिकाणी होत असलेल्या आंदोलनांना चिरडण्याचा प्रयत्न सुरू केला. शनिवारी सुरक्षा दलाने इस्लामाबादमध्ये कारवाई सुरू केली. तेव्हा हिंसक वळण मिळाले.  


हिंसाचाराचे लोण देशभरात पसरू नये म्हणून पाकिस्तान सरकारने फेसबुक, ट्विटर व यू-ट्यूबसारख्या सोशल मीडियाची सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद केली आहे. आंदोलकांच्या विरोधातील कारवाई सुरू असेपर्यंत सोशल मीडिया बंद ठेवला जाणार आहे.  

 

शहरात तणावपूर्ण स्थिती  
रसूल अल्लाह संघटनेने एक  आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन सुरू असल्यामुळे शहरातील परिस्थिती तणावपूर्ण बनली होती. असंख्य आंदोलकांनी रस्त्याच्या कडेला ठिय्या मांडला. या आंदोलकांना हटवण्यासाठी सुरक्षा दलाने प्रयत्न केले. तेव्हा निदर्शक-सुरक्षा दलात चकमक उडाली. गेल्या वीस दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे.  

 

> 500 पेक्षा जास्त आंदोलकांनी कराचीत प्रमुख रस्ते रोखले. १५० लोकांना पोलिसांनी अटक केली आहे. 
> 2000 आंदोलक रावळपिंडीला इस्लामाबाद व मुर्री रोडला जोडणाऱ्या एक्स्प्रेस वेच्या फैजाबाद ब्रिजवर ८ नोव्हेंबरपासून कब्जा करून बसले आहेत.

> इस्लामाबादसह इतर शहरांत चकमकी, एका पोलिसासह 6 ठार, टीव्ही चॅनल्सवर बंदी

 

आंदोलनाचे कारण

अल्पसंख्याक अहमदी समुदायबाबत कथित सौम्य भूमिकेमुळे पाकचे कायदामंत्री जाहिद हमीद व पंजाब प्रांताचे कायदामंत्री सनाउल्लाहांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.

 

पुढील स्लाईडवर आणखी फोटो आणि माहिती

बातम्या आणखी आहेत...