आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानात नवे स्कँडल : इमरान खान मला अश्लील मेसेज पाठवतात, महिला नेत्याचे आरोप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानत पनामा स्कँडलमुळे पंतप्रधानांनी पद गमावल्यानंतर नवे स्कँडल समोर आले आहे. - Divya Marathi
पाकिस्तानत पनामा स्कँडलमुळे पंतप्रधानांनी पद गमावल्यानंतर नवे स्कँडल समोर आले आहे.
इस्लामाबाद - पाकिस्तानत पनामा स्कँडलमुळे पंतप्रधानांनी पद गमावल्यानंतर नवे स्कँडल समोर आले आहे. यात पनामा प्रकरण सुप्रीम कोर्टात घेऊन जाणारे प्रमुख विरोधी पक्ष नेते इमरान खान यांच्यावर एका महिलेने गंभीर आरोप लावले आहेत. त्यांच्याच पीटीआय पक्षातील महिला नेत्याने केलेल्या आरोपानुसार, इमरान तिला अश्लील मेसेजेस पाठवतात. केवळ तिलाच नाही, तर पक्षातील दुसऱ्या महिलांसोबत सुद्धा ते असेच करतात. आयशा गुलालई असे त्या महिलेचे नाव असून तिने एक व्हिडिओ जाहीर केला. तो व्हिडिओ सोशल माध्यमांवर व्हायरल झाला आहे. 
 
 
सेक्शुअल हरॅसमेंटचे आरोप
- इमरान खान यांच्यावर लैंगिक अत्याचाराचे आरोप लावताना आयशा यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि राष्ट्रीय सभागृहाच्या सदस्त्यत्वाचा राजीनामा दिला. 
- आयशाने मंगळवारी इमरान खान यांच्या आरोप लावण्यासाठी पत्रकार परिषद आयोजित केली. त्यामध्ये आयशाने सांगितल्याप्रमाणे, इमरान खान मला एवढे अश्लील मेसेजेस करतात की ते जाहीरपणे कुणालाही सांगता येत नाही. आपल्यापेक्षा चांगल्या लोकांची इमरान यांना ईर्शा वाटते.
 
 
भ्रष्टाचाराचे आरोप
- यासोबतच आयशाने खैबर-पख्तुनख्वा च्या पीटीआय सरकार आणि तेथील मुख्यमंत्री परवेझ खटक यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप लावले आहेत. 
- पीटीआय नेत्या शिरीन मजारींनी आयशाचे आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. त्यांना पक्षाने तिकीट न दिल्यानेच असले आरोप केले जात आहेत असा दावा शिरीन यांनी केला. इमरान खान महिलांचा खूप आदर करतात. त्यामुळे आयशाने लावलेले आरोप खोटे आहेत. 
 
 
नवाज शरीफांचे कौतुक
- विरोधी पक्ष नेते इमरान खान यांच्यावर आरोप लावणाऱ्या आयशाने माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे कौतुक केले. शरीफ इमरान यांच्यापेक्षा चांगले नेते आहेत. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असतील, मात्र ते इमरान यांच्यासारखे कॅरेक्टरलेस तर नाहीत. 
- उल्लेखनीय बाब म्हणजे, पनामा पेपर्स प्रकरणी आरोपानंतर सुप्रीम कोर्टाने शरीफांना अपात्र ठरवले. त्यांच्या विरोधात खटल्याला इमरान यांनीच लीड केले होते.
 
 
बातम्या आणखी आहेत...