आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मीडियाचा दावा- इम्रानवर विषप्रयोग करुन पक्षावर एकछत्री अंमल करणार होती रेहाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्तानचा प्रसिद्ध क्रिकेटर आणि राजकीय नेता इम्रान खानने काही दिवसांपूर्वी दुसरी पत्नी रेहामला तलाक देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र दोघांनी ते का विभक्त होत आहेत, यावर भाष्य करण्याचे टाळले होते. दरम्यान पाकिस्तानच्या एका ज्येष्ठ पत्रकाराने खुलासा केला आहे, की रेहाम इम्रानला स्लो पॉयझन देऊन मारणार होती आणि तो अध्यक्ष असलेल्या तहरिक-ए-पाकिस्तान पक्षावर ताबा मिळवण्याची तिची इच्छा होती. हा खुलासा पाकिस्तानी मीडियामध्ये असा पसरला की त्याच्या पक्षाला पुढे येऊन स्पष्टीकरण द्यावे लागले आहे. या स्पष्टीकरणात म्हटले आहे, की रेहाम इम्रानला मारहाण करत होती, तिने त्याला मारण्याचे षडयंत्र रचले होते, या निव्वळ अफवा आहेत. आमच्या पक्ष नेत्याला बदनाम करण्याचा हा डाव आहे.
पत्रकाराने काय दावा केला ?
पाकिस्तानी पत्रकार आरिफ निजामी यांनी पाकिस्तानी चॅनल न्यूज 24 ला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते, 'पाकिस्तानी गुप्तचर संस्थेने इम्रानला त्याच्या जवळच्या मित्रांकडून कळविले होते, की रेहाम कधीही दगाफटका करु शकते. तिचा इरादा इम्रानाल स्लो पॉयझन देऊन संपवण्याचा होता. त्यानंतर ती पक्षावर एकछत्री राज्य करणार होती.'

निजामींच्या दाव्यात किती दम
पाकिस्तान विषयाचे तज्ज्ञ मानतात की निजामींच्या दाव्यात तथ्य असण्याची शक्यता आहे. त्यांचे वक्तव्य सरधोपटपणे नाकारता येणार नाही. जेव्हा इम्रान आणि रेहाम यांचे डिसेंबर 2014 मध्ये लग्न झाले तेव्हा त्याची पहिली बातमी निजमींनीच दिली होती. त्यानंतर त्यांच्या तलाकची बातमीही त्यांनीच ब्रेक केली होती. जेव्हा सप्टेबरमध्ये त्यांनी इम्रान-रेहामच्या काडीमोडची बातमी ब्रेक केली होती तेव्हा त्यांना तहरिक आणि नागरिकांच्याही रोषाचा सामना करावा लागला होता. मात्र निजामी आपल्या वक्तव्यावर ठाम होते. अखेर त्यांचे म्हणणे खरे ठरले.

विषप्रयोग झाला होता ?
निजामींच्या म्हणण्यानूसार, इम्रानवर काही दिवसांपूर्वी विषप्रयोग झाला होता. त्याने रेहामने दिलेले लाडू खाल्ले होते आणि त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते.
षटकार तर कोणीही मारू शकतो, संयमीत शतक करणे अवघड
दरम्यान, तलाकनंतर रेहामने प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे. ब्रिटनमध्ये प्रतिक्रिया देताना रेहामने एकाही प्रश्नाचे सरळ उत्तर दिले नाही. ती म्हणाली, 'षटकार तर तर कोणीही मारु शकतो, मात्र संयमीत भागीदारी करत शतक पूर्ण करणे यात खरे आव्हान असते.' तिचा रोख इम्रान आणि तिच्या नात्यावर असल्याचे मानले जाते.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, इम्रान आणि रेहामचे ट्विट आणि कोण आहे रेहाम