आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Punjab Government Filed Petition Against Lakhvi's Release In Supreme Court

पंजाब सरकारचे लखवीच्या सुटकेविरुध्‍द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लाहोर (प‍ाकिस्तान) - पंजाब सरकारने मंगळवारी(ता.14) झकीऊर रहमान लखवीच्या सुटकविरुध्‍द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली.सरकारने लाहोर उच्च न्यायालयाने लखवीच्या सुटकेच्या आदेशाविरुध्‍द सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. लखवी हा मुंबईवरील 2008 मधील दहशतवादी हल्ल्यातील मुख्‍य आरोपी आहे.

याचिका पंजाब सरकारच्या गृह खात्याने दाखल केली असून त्यात म्हटले आहे,की लखवीविरुध्‍द पुरेसे पुरावे असतानाही उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अन्वरुल हक यांनी सुटकेचे आदेश दिले आहेत.सार्वजनिक व्यवस्थेत अडथळे येऊ नये म्हणून सर्वोच्च न्यायालयाने लाहोर उच्च न्यायालयाचा निर्णय स्थग‍ित करावे, असे याचिकेत म्हटले आहे.