आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कंदीलला आमच्यापासून हिरावून नेले, मुलाला फाशी द्या- आई वडिलाची मागणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कंदील बलोच व तिचे वडील... - Divya Marathi
कंदील बलोच व तिचे वडील...
लाहोर - सन्मान राखण्याच्या नावाखाली आमच्या मुलाने बहिणीची हत्या केली आहे. पण आम्ही त्याला माफ करणार नाही. थंड डोक्याने केलेल्या या हत्येसाठी त्याला फाशी देण्यात यावे, हीच आमची इच्छा आहे, असे प्रतिपादन पाकिस्तानमधील सेलिब्रिटी कंदील बलोच हिच्या पालकांनी केले आहे. आई-वडिल म्हणाले, कंदीलला हिरावून नेले आमच्यापासून...
- कंदीलचे वडील मुहंमद अझीम म्हणाले की, माझ्या मुलाने जे केले आहे त्यासाठी मी त्याला कधीही माफ करणार नाही.
- माझा मुलगा मुहंमद वसीम आणि इतर तीन संशयितांना त्यांच्या कृत्याबद्दल फाशीच व्हावी.
- त्यांना फाशी झाली किंवा किमान जन्मठेपेची शिक्षा झाली तरच मला आनंद होईल.
- वसीमने आमच्यापासून कंदीलला हिरावून नेले आहे. खरे सांगायचे तर कंदील ही आमच्यासाठी मुलगाच होती, तिने आमची चांगली काळजी घेतली असती.
ऑनर किलिंगची घटना-
- कंदीलची आई अन्वर माई यांनीही पतीप्रमाणेच भावना व्यक्त केली.
-‘माझ्या सुंदर मुलीला थंड डोक्याने ठार मारणाऱ्या वसीमला माफ करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही,’ अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
- कंदील बलोच या मॉडेल-अभिनेत्रीची मुलतान जिल्ह्यात 15 जुलैला हत्या झाली होती.
- कुटुंबीयांच्या सन्मानासाठीच आपण तिची हत्या केली होती, अशी कबुली कंदीलचा भाऊ वसीमने दिली होती.
- कंदीलच्या हत्येनंतर पाकिस्तानमध्ये खळबळ उडाली होती. ऑनर किलिंगच्या अनेक घटना देशात उजेडात येत आहेत.
सरकारच आहे फिर्यादी-
- या प्रकरणात पाकिस्तान सरकारच फिर्यादी झाले आहे.
- गेल्या आठवड्यात नवाझ शरीफ यांच्या सरकारने संबंधित कायद्यात दुरुस्ती केली आहे.
- मारेकरी मोकाट फिरू नयेत हा या दुरुस्तीचा हेतू आहे.
- राजधानीतील पोलिस अधिकारी अझहर अक्रम यांनी सांगितले की, एफआयआरमध्ये कलम 311 चा समावेश करण्यात आला आहे.
- त्याचा अर्थ गुन्हेगारांना माफी न देणे असा होतो.
पुढे स्लाईडद्वारे पाहा व वाचा, पाकिस्तानी मॉडेल कंदील बलोच हिच्याबाबत...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...