आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAK च्या वर्तणुकीवर राजनाथ संसदेत म्हणाले - माझी काही तक्रार नाही, पण हा शेजारी बदलत नाही

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली/इस्लामाबाद - पाकिस्तान दौऱ्यावर झालेल्या वादानंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांनी शुक्रवारी संसदेत निवेदन केले. राज्यसभेत सिंह म्हणाले, 'मी सार्क परिषदेत स्पष्ट सांगितले की एखाद्या देशाचा दहशतवादी दुसऱ्या देशासाठी शहीद होऊ शकत नाही. दहशतवाद चांगला किंवा वाईट असू शकत नाही.' पाकिस्तानचा उल्लेख करताना राजनाथ म्हणाले, 'हा असा शेजारी आहे जो सुधरत नाही.' राजनाथ यांच्या वक्तव्याचे काँग्रेससह सर्वच विरोधीपक्षांनी एकत्रीत समर्थन केले, हे विशेष. सार्क देशांच्या गृहमंत्र्यांची परिषद अर्धवट सोडून राजनाथ गुरुवारी भारतात परतले होते. त्यांनी पाकिस्तानला त्यांच्या भूमीवरच दहशतवादावरुन खडसावले होते.

राजनाथसिंह म्हणाले - सार्क देशांतील गृहमंत्र्यांच्या परिषदेत मी दहशतवादाविरोधात अभियान राबवण्याबद्दल बोललो.
- भारताच्या वतीने मी दहशतवादाचा मुद्दा उपस्थित केला. मी केवळ दहशतवाद्यांविरोधात नाही तर दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या देशांविरोधातही कारवाईची गरज असल्याचे सांगितले.
- सार्क देशांनी दहशतवाद्यांच्या प्रत्यार्पणाचे कडक नियम करण्याची गरज असल्याचे सांगितले.
- मला पाकिस्तानात होणाऱ्य़ा विरोधाची चिंता नव्हती, जर तसे असते तर पाकिस्तानात गेलोच नसतो. त्यांना जे करायचे होते ते त्यांनी केले. त्याबद्दल प्रतिक्रिया देण्याची गरज वाटत नाही. आणि त्याबद्दल कोणतीही तक्रार नाही.
पुढील स्लाइडमध्ये,
> काय झाले पाकिस्तानात...
> वाचा राजनाथसिंह पाकिस्तानमध्ये काय म्हणाले....
बातम्या आणखी आहेत...