इस्लामाबाद - भारतात दहशतवाद पसरवणा-या पाकिस्तानच्या लष्कराने प्रथमच जाहीरपणे भारतावरच अतिरेकी कारवाया करण्याचा आरोप केला आहे. रावळपिंडी लष्करी मुख्यालयात लष्कराच्या कमांडरांच्या संमेलनानंतर जारी झालेल्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. त्यानुसार, पाकिस्तानातील अतिरेकी कारवायांत भारताच्या "रॉ' या गुप्तचर संस्थेचा सहभाग आहे. त्याचे पुरावे
आपल्याकडे आहेत.
संमेलनात सहभागी एका अधिका-याने सांगितले की, बलूचिस्तानात होत असलेल्या बंडखोरीमागे भारताचा हात असल्याची चर्चा झाली. भारत पाकिस्तानच्या शत्रूंना सर्व प्रकारची मदत करत आहे, मग ते तालिबानी पाकिस्तानी असो वा कराची, बलुचिस्तानातील बंडखोर. संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले, "रॉ' ही शत्रूची संघटना आहे. या संघटनेची स्थापनाच मुळात पाकिस्तानला जगाच्या नकाशावरून मिटवण्यासाठी झाली होती.