आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकमधील दहशतवादी कारवायांत ‘रॉ’चा सहभाग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानात होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांमागे "रॉ' या भारतीय गुप्तचर संघटनेचा हात असल्याचा वायफळ दावा पाकिस्तानचे परराष्ट्र सचिव एजाज अहमद चौधरी यांनी केला आहे.

बुधवारी कराचीत झालेल्या गोळीबाराबाबत बोलताना चौधरी यांनी हा मुद्दा अनेकदा भारतापुढे मांडल्याचेही सांगितले. ते म्हणाले, कराचीतील गोळीबारामागे दाएश या दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा दावा करणे घाईचे ठरेल. घटनास्थळी सापडलेल्या कागदपत्रांच्या आधारे असे सांगता येणे कठीण आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दरम्यान, या हल्ल्यात रॉ (रिसर्च अँड अॅनाॅलिसिस विंग) चा हात असण्याची शक्यताही चौधरी यांनी व्यक्त केली आहे. राॅकडून प्रशिक्षित दोन लोकांना नुकतीच अटक करण्यात आल्याचेही ते म्हणाले. दरम्यान, बुधवारी मोटारसायकलस्वार हल्लेखोरांनी बसवर अंदाधुंद गोळीबार करत ४७ लोकांचा जीव घेतला. दाएश या कुख्यात दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी घेतली आहे. पाकिस्तानच्या काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही काही दिवसांपूर्वी रॉ वर दहशतवादाचा आरोप केला होता.