आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शरीफ लष्करविरोधी असल्याची तक्रार रद्द; आयएसआयच्या अखत्यारीतील विषय असल्याची सबब

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्यावर लष्कराविषयी मानहानी करणारी वक्तव्ये केल्याची तक्रार नोंदवण्यात आली होती. पाकिस्तानच्या पोलिसांनी या सर्व तक्रारी रद्द ठरवल्या आहेत. नवाझ जनतेला लष्कराविरुद्ध चिथावत असल्याचा आरोप होता.  पोलिसांनी ३ मे रोजी ही तक्रार नोंदवली होती. रावळपिंडीतील वकील इश्ताक अहमद मिर्झा यांनी ही तक्रार केली होती. तपासानंतर ही बनावट तक्रार असल्याचे उघडकीस आल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले. 

व्हॉट्सअॅपद्वारे आपल्याला एक व्हिडिओ क्लिप आली होती असे इश्ताक यांनी तक्रारीत नमूद केले होते. यात एक व्यक्ती लष्कराविरुद्ध चिथावणीखोर वक्तव्ये करत होती. ही व्यक्ती म्हणजे पंतप्रधानच असल्याचा दावा वकिलाने केला. केंद्रीय गुप्तचर विभागाच्या अंतर्गत सायबर क्राइम विभाग येत असल्याने ही तक्रार आम्ही रद्द ठरवत असल्याचे पोलिस विभागाने सांगितले. या तक्रारीचे स्वरूप एफआयआरसारखे नाही. पोलिस डायरीमध्ये ही तक्रार नोंदवण्यात आल्याचा खुलासा पोलिसांनी केला.  

लादेनकडून लाच घेतल्याचा आरोप: पाकिस्तानचे विरोधी पक्ष नेता इमरान खान यांच्या पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ पार्टीने (पीटीआय) पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी अल कायदाचा सर्वेसर्वा आेसामा  बिन लादेनकडून लाच घेतल्याचा आरोप केला आहे. काश्मीरमध्ये जिहाद सुरू ठेवण्यासाठी शरीफ यांनी पैसा घेतल्याचे तेहरिकचे म्हणणे आहे. पीटीआयचे प्रवक्ता फवाद चौधरी यांनी शरीफ यांच्याविरुद्ध सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. पाकिस्तान गुप्तहेर संस्था आयएसआयचे वर्ष २०१० मधील हेर  खलीद ख्वाजा यांच्यावरील पुस्तकाचा संदर्भ पीटीआयने याचिकेमध्ये दिला आहे. खलीद यांची पत्नी शमामा खलीद यांनी त्यांच्या खुनाचे रहस्य यात उलगडले असून ‘खलीद ख्वाजा: शहीद-ए -अमन’ या पुस्तकात अनेकांच्या मुलाखती आहेत.
बातम्या आणखी आहेत...