आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाकिस्‍तान लष्‍कराचा प्रमुख बदलणार, हे चौघे स्‍पर्धेत, नवाज शरीफ करणार एकाची निवड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - पाकिस्‍तानचे लष्‍कर प्रमुख राहील शरीफ नोव्‍हेंबरमध्‍ये निवृत्‍त होत आहेत. त्‍यामुळे नवीन लष्‍कर प्रमुखाच्‍या निवडीसाठी हालचाली गतीमान झाल्‍या असून, पंतप्रधान नवाज शरीफ चौघांमधून एकाची निवड करणार आहेत. दरम्‍यान, भारताकडे पाहण्‍याचा दृष्‍टीकोण आणि भारत - पाकिस्‍तान संबंधाला महत्‍त्‍व हे निकष या निवडीमध्‍ये असणार असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.
या चौघांचे नाव चर्चेत
> नवीन लष्‍कर प्रमुखाच्‍या स्‍पर्धेत चौघांची नाव आघाडीवर आहेत. ते सर्व लेफ्टिनेंट जनरल आहेत.
> यात जुबैर हयात, इश्फाक नदीम अहमद, जावेद इकबाल रामदे आणि कमर जावेद बाजवा यांचा समावेश आहे.
> पंतप्रधान नवाज यांच्‍या एका निकटवर्तीयाने सांगितले, 'ज्‍या अधिकाऱ्याचे पंतप्रधानासोबत चांगले संबंध आहेत, तोच नवीन आर्मी प्रमुख असेल.'

नेमके कोण आहेत ते चार उमेदवार ?
> जुबैर हयात हे आर्टिलरीचे चीफ ऑफ जनरल स्टाफ आहेत. त्‍यांचे वडील निवृत्‍त मेजर जनरल होते. त्‍यांचे दोन भाऊसुद्धा सैन्‍यात होते.
> नदीम अहमद सध्‍या मुल्तानचे कोर कमांडर आहेत. ते पाक व्‍याप्‍त कश्मीर रेजिमेंटशी संबंधित आहेत.
> जावेद इकबाल रामदे बहावलपूर कोरचे प्रमुख आहेत. ते इस्लामाबादमध्‍ये नॅशनल डिफेंस यूनिवर्सिटीचे अध्‍यक्ष होते.
> कमर जावेद बाजवा यांचा काश्‍मीर आणि उत्‍तर भागातील समस्‍यांचा चांगला अनुभव आहे.
बातम्या आणखी आहेत...