आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानने अशी अवस्था करुन ठेवली समृद्ध बलुचिस्तानची, पाहा PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बलुचिस्तानमधील छत नसलेल्या शाळेची स्थिती. - Divya Marathi
बलुचिस्तानमधील छत नसलेल्या शाळेची स्थिती.
इंटरनॅशनल डेस्क- गेल्या वर्षी पाकिस्तानातील बलुचिस्तानमधून अटक केलेल्या कूलभूषण जाधव नावाच्या व्यक्तीला पाकिस्तानमधील स्थानिक कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. गेल्या वर्षी मार्च महिन्यात भारतीय गुप्तचर संस्था रॉच्या एका गुप्तहेराला अटक केल्याचा दावा पाकिस्तानने केला होता. कुलभूषण जाधव हे पूर्वी भारतीय नौदलात नोकरी करत होते. मात्र, निवृत्तीनंतर त्यांनी उद्योगात रस घेतला. यासाठीच ते विविध देशात फिरत होते. मात्र, पाकिस्तानचे म्हणणे आहे की, ते रॉचे एजंट आहेत. तसेच पाकिस्तानात कारवाया करण्यासाठी खोटे नाव धारण बनावट पासपोर्टवर पाकमध्ये आले होते.
 
गेल्या वर्षी १५ ऑगस्ट २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून केलेल्या भाषणात बलुचिस्तानचा उल्लेख केल्यानंतर पाकिस्तानमध्‍ये विरोधाचे सूर तीव्र झाले होते. बलूच नेते येथे होत असलेल्या मानवी हक्कांच्या उल्लंघनाविरोधात पाकिस्तानविरोधात जगभर निदर्शने करत असतात. हा प्रदेश नैसर्गिक साधनसंपत्तीने समृध्‍द आहे. असे असताना बलुचिस्तान पाकिस्तानचा सर्वात गरीब प्रांत आहे. पाक सैनिक करत आहे सामान्य जनतेचे शोषण...
 
- पाकिस्तानचे केंद्रीय सरकार त्रास देत असून आम्ही आमच्या हक्कांपासून वंचित आहोत.
- या विरोधात बलुचिस्तान लिबरेशन आर्मी व लष्‍कर ए बलुचिस्तानसारख्‍या फुटीरवादी गट नियमित स्वातंत्र्यासाठी संघर्ष करत आहेत.
- दुसरीकडे पाक सैनिकांनी फुटीरवाद्यांविरोधात युध्‍द पुकारले आहे. मोठ्याप्रमाणावर लष्‍करी अभियान सुरु आहे.
- परिणामी पाक सैनिक येथे अपहरण, शोषण आणि हत्या करत आहे. यावरुन पाकिस्तानविरोधात सूर तीव्र होत आहे.
- बलूच नेता नायला कादरी म्हणाले होते, की बलुचिस्तानमध्‍ये पाकिस्तान रासायनिक शस्त्रांचा वापर करत आहे. येथे लोकांबरोबर चिमुकल्यांचाही बळी घेतला जात आहे.
- बलुचिस्तानमधील लोक अनेक दशकांपासून नाराज आहेत.
 
गरिबी आणि बेरोजगारी उच्च पातळीवर-
 
- बलुचिस्तानमध्‍ये गरिबी व बेरोजगारीचे चित्र आणखी चक्रावून देणारे आहे.
- 2013 मध्‍ये प्रकाशित झालेल्या एका अहवालानुसार, येथे 46.68 टक्के लोकसंख्‍या दारिद्र्य रेषे खाली जीवन जगत आहेत.
- बलुचिस्तान नैसर्गिक साधनसंपत्तीच्या दृष्‍टीने श्रीमंत देश असूनही पाकिस्तानमधील हा सर्वात गरीब राज्य आहे.
- पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटस्टिक्सच्या आकडेवारीनुसार, प्रांतात रोजगार मिळण्‍याची संधी केवळ 4 टक्के आहे.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, साधनसंपत्तीने समृद्ध असलेल्या बलुचिस्तानची छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...