आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PAK ची गुप्तचर संस्था ISI चीफची गच्छंती, 13 महीने आधीच सुट्टी करण्याचा निर्णय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिझवान यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2017 पर्यंतचा आहे. - Divya Marathi
रिझवान यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2017 पर्यंतचा आहे.
इस्लामाबाद - भारतीय कमांडोंनी पाकव्याप्त काश्मिरात केलेल्या सर्जिकल स्ट्राइकच्या 9 दिवसांनंतर पाकची गुप्तचर संस्था ISI चे प्रमुख लेफ्टनंट जनरल रिझवान अख्तर यांना हटवले जाणार आहे. अख्तर यांना हटवण्याचा निर्णय आर्मी चीफ जनरल राहील शरीफ यांनी घेतला आहे. त्यांच्या जागी लेफ्टनंट जनरल नवीद मुख्तार यांना ही जबाबदारी देण्यात येणार आहे. रिझवान यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2017 पर्यंतचा आहे.

3 वर्षे असतो कार्यकाळ
- एका पाकिस्तानी वृत्तपत्रानुसार रिझवान यांची अपॉइंटमेंट सप्टेंबर 2014 मध्ये झाली होती. त्यांनी नोव्हेंबर 2014 मध्ये कार्यभार स्वीकारला होता.
- ISI प्रमुखाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असतो. त्यानुसार रिझवान 2017 पर्यंत या पोस्टवर असणार होते. पण आता त्यांना हटवण्याचे वृत्त येत आहे.
- रिझवान यांची लेफ्टनंट जनरल जहीर-उल-इस्लाम यांच्याजागेवर नियुक्ती झाली होती.

मुख्तार नवे चीफ..
- रिपोर्टनुसार जनरल नावेद मुख्तार हे रिझवान यांची जागा घेऊ शकतात.
- नवीद कराचीमध्ये डिजी होती. सिंध प्रांताबाबत त्यांना सखोल माहिती आहे.
- पण आर्मी चीफ राहील शरीफ रिटायर होणार की, त्यांना एक्सटेन्शन मिळणार यावर रिझवान यांचे भवितव्य ठरेल.
- पाक आर्मीचे स्पोक्सपर्सन आसीम बाजवा यांनी रिझवान यांना हटवल्याचे वृत्त फेटाळले होते.

कारण..
- रिझवान यांना हटवले तर त्याचे कारण भारताने केलेले सर्जिकल स्ट्राइक हेच असेल.
- 18 जुलैला काश्मीरच्या उरीमध्ये आर्मी कॅम्पवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यानंतर भारताने पीओकेमध्ये सर्जिकल स्ट्राइक केले होते. त्यात 38 दहशतवादी मारले गेले होते.
बातम्या आणखी आहेत...