आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्या संयुक्त लष्करी सरावासाठी रशियन सैन्य पाकिस्तानमध्ये दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - शीतयुद्धाच्या काळात परस्परांचे शत्रू असलेले रशिया-पाकिस्तान यांच्यातील पहिल्या संयुक्त लष्करी सराव शनिवारपासून सुरू होत असून रशियन पायदळ पाकिस्तानात दाखल झाले आहे. दोन आठवडे हा सराव चालेल. भारतात उरी सेक्टरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताचे एकेकाळचे मित्रराष्ट्र रशिया पाकमधील लष्करी सराव रद्द करेल असे मानले जात होते. मात्र, हा सराव होत असल्याने दोन्ही देशांतील लष्करी सहकार्याची ही मुहूर्तमेढ मानली जात आहे. मे २०११ मध्ये धडक कारवाईत अमेरिकेने ओसामा बिन लादनेचा खात्मा केल्यापासून पाकचे अमेरिकेशी संबंध ताणले गेले आहेत.
बातम्या आणखी आहेत...