आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अशा रंगीन पार्टीजसाठी प्रसिद्ध होत्या बेनझीर, निम्म्या वयाच्या मुलासमवेत होते रिलेशन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनझीर यांचा फाईल फोटो.... - Divya Marathi
पाकिस्तानची माजी पंतप्रधान बेनझीर यांचा फाईल फोटो....
इंटरनॅशनल डेस्क- पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान दिवंगत बेनझीर भुत्तो यांचा बुधवारी 21 जून रोजी जन्मदिवस आहे. बेनझीर पाकिस्तानच्या पहिल्या पंतप्रधान होत्या. पाकिस्तानमधील प्रसिद्ध राजकीय घराण्यात त्यांचा जन्म झाला होता. पाकिस्तानचे माजी पंतप्रधान जुल्फिकार अली भुट्टो त्यांचे वडील होते. वयाच्या केवळ 35 व्या वर्षी त्या पाकिस्तानच्या पहिल्या महिला पंतप्रधान झाल्या होत्या.

त्यांनी 19 ऑक्टोबर 1993 रोजी दुसर्‍यांदा पाकिस्तानच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. भुत्तो फॅमिलीला राजकारणात प्रतिष्ठा मिळवून देणार्‍या बेनझील यांनी हार्वर्ड आणि ऑक्सफोर्ड यूनिव्हर्सिटीतून शिक्षण घेतले होते. त्यांच्याकडे दूरदृष्टी होती. तसेच आधुनिक विचारसरणीच्या नेत्या म्हणून त्यांची ओळख होती. पण, लोकप्रियतेसोबत त्यांची कारकिर्द वादग्रस्तही ठरली होती. सेक्स पार्टीजमुळे त्या अनेकदा कॉन्ट्रोव्हर्सीमध्ये अडकल्या होत्या. पाकिस्तानमध्ये सार्वत्रिक निवडणुकीची धामधुम सुरु असताना झालेल्या गोळीबारात बेनझिर यांचा डिसेंबर 2007 मृत्यू झाला होता. यावेळी त्या केवळ 54 वर्षांच्या होत्या.
 
बेनझीर यांच्या व्हिलामध्ये व्हायची 'सेक्स पार्टीज'-
 
लंडनमध्ये रोशन मिर्झाद्वारा लिखित पुस्तक 'Indecent Correspondence: Secret Sex Life of Benazir Bhutto'मध्ये बेनझील भुत्तो यांच्याबाबतील अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहेत. रोशन यांच्या पुस्तकानुसार, बेनजीर आणि मोरक्कन ‘गो-गो बॉय’मध्ये फिजिकल रिलेशन होते. एवढेच नाही तर, बेनझीर आणि अमेरिकेतील पाकिस्तानी राजदूत दिवंगत शेरी रहेमानद्वारा सेक्स पार्टीजचे आयोजन करण्यात येत होते, असा दावा देखील रोशन मिर्झा यांनी पुस्तकात केला आहे.
 
'उमर' नामक मोरक्कन तरुणासोबत होते बेनझीर यांचे रिलेशन-
 
रोशन मिर्झा यांनी आपल्या पुस्तकात म्हटले आहे की, बेनझीर यांचे शेरी रहेमान यांच्या व्यतिरिक्त उमर नामक एका मोरक्कन तरुणासोबत फिजिकल रिलेशन होते. त्यावेळी उमरचे वय बेनझीर यांच्या वयापेक्षा निम्मे होते. रोशन यांनी हा दावा उमर आणि सारा नामक एका पाकिस्तानी तरुणीसोबत संवाद साधल्यानंतर केला आहे. यादरम्यान, उमरने स्वत: बेनझीर यांच्यासोबत फिजिकल रिलेशन ठेवले होते, असे सांगितले होते.
 
2007 मध्ये परतल्या होत्या देशात पण मृत्यूने गाठले- 
 
1988-90 आणि 1993-96 मध्ये बेनझिर भुट्टो पाकिस्तानच्या पंतप्रधान होत्या. 2007 मध्ये पाकिस्तानमध्ये जेव्हा लष्करी सत्ता कमकुवत झाली होती आणि लोकशाहीसाठी आवाज उठवला जात होता तेव्हा बेनझिर पाकिस्तानमध्ये परतल्या होत्या. तत्कालिन राष्ट्रपती परवेज मुशर्ऱफ यांनी त्यांना परतीची परवानगी दिली होती. परंतु, दहशतवाद्यांकडून जिवघेणा हल्ला होऊ शकतो, असे बजावलेही होते. यावेळी दुबई येथून कराचीची फ्लाईड पकडताना त्या म्हणाल्या होत्या, की माझी सर्वांत मजबूत सुरक्षा माझा खुदा आहे. त्याची माझ्यावर कृपा असेल तर माझे काहीही वाईट होणार नाही. बेनझिर अशा पहिल्या महिला होत्या ज्या लोकशाही तंत्राने मुस्लिम राष्ट्रात पंतप्रधान झाल्या होत्या. अमेरिकेच्या हार्वर्ड विद्यापिठातून पदवी घेतल्यानंतर ऑक्सफोर्डमधील इंटरनॅशनल लॉ अॅंड डिप्लोमसी कोर्ससाठी त्या गेल्या होत्या.
 
वडीलांचा मृत्यू-
 
पाकिस्तानचे लष्करी शासक जिया उल हक यांच्या कार्यकाळात (1977) बेनझिर यांचे वडील जुल्फिकार अली भुट्टो यांना फासावर चढवण्यात आले होते. त्यानंतर बेनझिर यांनी वडीलांचा पक्ष पाकिस्तान पीपुल्स पार्टीची धूरा सांभाळली. त्यानंतर त्या पाकिस्तानच्या पंतप्रधान झाल्या.
 
पुढील स्लाईड्सवर वाचा, बेनझीर भुत्तो कुठे करत होत्या सेक्स पार्टीज...
बातम्या आणखी आहेत...