आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सौदी अरेबियाने उद्धवस्त केले शिया बंडखोरांचे शहर, समोर आले हे PHOTOS

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सौदीतील सिक्युरिटी फोर्सच्या ऑपरेशनमध्ये नष्ट झालेले आवामिया शहर... - Divya Marathi
सौदीतील सिक्युरिटी फोर्सच्या ऑपरेशनमध्ये नष्ट झालेले आवामिया शहर...
इंटरनॅशनल डेस्क- सौदी अरेबियातील पूर्व भागात बंडखोरांना नष्ट करण्यासाठी सुरक्षा अभियान चालवले जात आहे. या अभियानामुळे सौदीतील छोटे शहर आवामियाला सर्वात जास्त नुकसान सहन करावे लागले. हा शिया मुस्लिम बहुल लोकांचा भाग आहे. सिक्युरिटी फोर्सेजच्या ऑपरेशनमुळे येथील शेकडो घरे उद्धवस्त झाली आहेत. या आपरेशनमुळे हजारो लोक शहर सोडून गेले आहेत. एका आठवड्यात 9 लोकांचा मृत्यू...
 
- पोलिसांवर हल्ला करणा-या बंडखोरांना संपविण्यासाठी सिक्युरिटी फोर्सेज आवामियात मागील 3 महिन्यांपासून अभियान चालवत आहे.
- स्थानिक लोकांच्या माहितीनुसार, सिक्युरिटी फोर्सेजने ऑपरेशन वेगाने सुरु केल्याने या आठवड्यात 9 लोकांचा मृत्यू झाला आहे.
- लोकांचे म्हणणे आहे की, या ऑपरेशनमुळे या शहरातून सुमारे 20 हजार लोक दुस-या शहरात शिफ्ट झाले आहेत.
- तेथील सामाजिक कार्यकर्त्यांच्या माहितीनुसार, या ऑपरेशनमध्ये आतापर्यंत 5 बंडखोरांसोबतच 23 नागरिक मारले गेले आहेत.
- मीडिया रिपोर्ट्सनुसार, बुधवारी झालेल्या गोळीबारात तीन वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.  
- यात लोकांच्या घरांसोबतच धार्मिक स्थळांचेही मोठे नुकसान झाले आहे. 
- यूनायटेड नेशनने यापूर्वीच या 400 वर्षे जुन्या शहराचा सांस्कृतिक वारसा नष्ट होण्याने चिंता व्यक्त केली आहे.
- 30 हजार लोकसंख्या असलेल्या या छोट्याशा शहरातील लोक सौदी अरेबियातील सरकारचा विरोध करत आला आहे.
- मागील वर्षी या देशात एक शिया धर्मगुरू निम्र अल-निम्र यांना फाशीची शिक्षा दिल्यानंतर शिया लोक असलेल्या बंडखोरांचा विरोध वाढला आहे.
 
पुढे स्लाईड्सद्वारे पाहा, उद्धवस्त झालेल्या सौदीतील या छोट्या शहराचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...