आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाकिस्तानमध्ये व-हाडींच्या बसला आग, ११ ठार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कराची - पाकिस्तानच्या सिंध प्रांतात एका विवाहाच्या बसला लागलेल्या भीषण आगीत ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला, तर ३४ जण जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सात महिला, तीन मुलांचा समावेश आहे.

विवाहानंतर गाडीतून वधू-वरासह वऱ्हाडी मंडळी जात असताना ही आगीची घटना घडली. आग लागल्यानंतर काही पुरुषांनी बसमधून बाहेर उड्या टाकल्या. ते सुखरूप राहिले; परंतु अनेक जणांना बाहेर येता आले नाही. त्यात बसने अधिकच पेट घेतला. त्यात ११ जणांचा होरपळून मृत्यू झाला. सुदैवाने दुर्घटनेत वधू-वर सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले. ३४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

यातील ३२ जणांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर खैरपूर नाथन शाह रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, जानेवारी महिन्यात एक तेल टँकर बसवर धडकून झालेल्या अपघातात ६२ जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना मालिरजवळील राष्ट्रीय महामार्गावर घडली होती.