आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

म्हणे, जनमत चाचणी काश्मीर प्रश्नाचा तोडगा, फुटीरतावाद्यांना शरिफांचे पत्र

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी पुन्हा एकदा काश्मीर राग आळवला. जम्मू-काश्मीरचा प्रश्न सोडवण्यासाठी जनमताचा कौल घेतला पाहिजे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असा दावा त्यांनी केला आहे.

शरीफ यांनी दुख्तरान-ए-मिल्लत या संघटनेचे प्रमुख आसिया अंद्राबीला पाठवलेल्या पत्रात आपले हे मत व्यक्त केले आहे. काश्मीरप्रश्नी चांगले योगदान दिल्याबद्दल अंद्राबी यांनी शरीफ यांना पत्र पाठवून त्यांची स्तुती केली होती. त्यावर शरीफ यांनी हा पत्रव्यवहार केला. काश्मीर हा एक भौगोलिक प्रश्न असल्याचे पाकिस्तानला वाटत नाही. १९४७ च्या फाळणीनंतरची समस्या मानते. संयुक्त राष्ट्राने निश्चित केलेल्या आत्मसन्मानाच्या निर्णयाच्या अधिकारासाठी पाकिस्तान काश्मीरला सातत्याने पाठिंबा देत राहील. नैतिक, राजकीय, कूटनीतीच्या पातळीवर हे समर्थन राहील, असे शरीफ यांनी पत्रातून नमूद केले आहे.