आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विरोधात कट कारस्थान रचणे टाळले पाहिजे:शरीफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद/नवी दिल्ली - भारत आणि पाकिस्तानने एकमेकांच्या विरोधात कट रचणे टाळायला हवे असे पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ म्हणाले आहेत. दोन्ही देशांनी चांगल्या शेजाऱ्यांप्रमाणे राहायला हवे, असेही शरीफ म्हणाले. त्याचे कारण म्हणजे, शेजाऱ्यांमध्ये जर चांगले संबंध असतील तर शांतता आणि विकास दोन्ही साध्य होऊ शकते, असे ते म्हणाले. 

आणखी काय म्हणाले नवाज..  
- तुर्कस्तानच्या भेटीवर जाताना मीडियाशी बोलताना शरीफ म्हणाले, निवडणुकीच्या प्रचारात आमच्या पक्षाने भारताच्या विरोधात काहीही बोलले नाही. ही नकारात्मक परंपरा आम्ही बंद केली आहे. 
- नवाज म्हणाले, भारत आणि पाकिस्तानने आपसांत चांगले सबंध ठेवणे गरजेचे आहे. दोघांनीही एकमेकांच्या विरोधात कट रचणे टाळायला हवे. मात्र याबाबत त्यांनी फार खुलासा केला नाही. 

दहशतवाद संपवूनच राहू 
- गेल्यावर्षी 18 सप्टेंबरला उरी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानच्या नात्यांत जो तणाव आला होता, तो अजूनही कायम आहे. उरी हल्ल्यातील हल्लेखोर पाकिस्तानातून आले होते, असा भारताचा आरोप होता. या हल्ल्यात भारताचे 19 जवान शहीद झाले होते. 
- या हल्ल्याच्या अवघ्या 10 दिवसांनंतर भारताने पाकिस्तानमध्ये सर्जिकल स्ट्राइक करत प्रत्युत्तर दिले होते. सीमेच्या पलिकडे करण्यात आलेल्या या कारवाईत 40 पेक्षा अधिक दहशतवादी आणि पाकिस्तानी लष्कराचे काही जवान मारले गेले होते. 
- काश्मीर मुद्द्यावर तुर्कस्तानने साथ दिल्याबद्दल नवाज यांनी आभार मानले. तुर्कस्तानने पाकिस्तानला एनएसजी मेंबरशिप देण्याचा पाठिंबा दिला आहे. 
- नवाज म्हणाले, पाकिस्तानात काही लोक दहशतवाद पसरवत आहेत. अशा लोकांना संपवून आण्ही पाकिस्तानला सगळ्या क्षेत्रात यश मिळवून देण्यचा प्रयत्न करणार आहोत. पाकिस्तानात होत असलेल्या हल्ल्यात विदेशी शक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही, असेही ते म्हणाले. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...