आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काश्मीर हाच भारत-पाकमधील कळीचा मुद्दा; पाक-काश्मीर एकता दिनी म्हणाले नवाझ शरीफ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद- पाकिस्तानेचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी रविवारी पुन्हा एकदा काश्मीरचा मुद्दा उकरून काढला आहे. भारत-पाकमध्ये काश्मीर हाच कळीचा मुद्दा आहे. काश्मीर विवाद सुटल्याशिवाय दोन्ही देशांच्या सीमेवर शांतता नांदू शकत नसल्याचे शरीफ यांनी म्हटले आहे.
पाक-काश्मीर एकता दिनी (काश्मीर सॉलिडेटरी डे) ते बोलत होते.

काश्मीर विवाद अद्याप संपुष्टात आला नाही आहे...
- 5 फेब्रुवारीला पाक-काश्मीर एकता दिन (काश्मीर सॉलिडेटरी डे) साजरा करण्यात आला. 
- शरीफ म्हणाले की, फाळणीनंतर भारत-पाकिस्तान आणि यूएन सिक्युरिटी काऊंसिलमध्ये काश्मीर विवाद हा महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे. मागील 70 वर्षांपासून भारत- पाकमध्ये या मुद्द्यावर चर्चा सुरु आहे. पण, अद्याप हा विवाद सुटला नाही. 
- मागील 70 वर्षांपासून भारताने काश्मीरमधील नागरिकांना त्यांचे अधिकार दिले नाही.
- काश्मीरमधील आपल्या बंधु-भगिनींना पाठिंबा द्यायला हवा. यामुळे त्यांच्या संघर्षाला बळ मिळेल, अशा शब्दात शरीफ यांनी पाकिस्तानी जनतेला आवाहन केले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा... काय म्हणाले नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र व्यवहार सल्लागार...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...