आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगातील सर्वात चौथा मोठा समुद्रच आटलाय, 68,000 km परिघात पसरलाय

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अरल समुद्र 1960 पासून ओसाड पडला आहे. - Divya Marathi
अरल समुद्र 1960 पासून ओसाड पडला आहे.
इंटरनॅशनल डेस्क- कॅनडातील सर्वात मोठा ग्लेशियरमधून वाहणारी स्लिम्स नदी सध्या चर्चेत आहे. मागील वर्षी केवळ चार दिवसात आटलेल्या या नदीबाबत शास्त्रज्ञांनी आता रिपोर्ट सादर केला आहे. यात म्हटले आहे की, ही नदी कशी ग्लोबल वॉर्मिंगची बळी ठरली आहे. याच समस्येने अरल समुद्राचा बळी गेला आहे. कजाकिस्तान आणि उत्तरी उज्बेकिस्तान यांच्या दरम्यान असलेला जगातील सर्वात चौथा मोठा समुद्र जवळपास 90 टक्के आटला आहे. हा समुद्र 68,000 किमी परिघात पसरला होता. जगातील सर्वात मोठे पर्यावरणीय संकट...
 
- एक अशीही वेळ होती जेव्हा 1 हजार 534 आयलँड्स असलेला अरल समुद्र बेटांचा समुद्र मानला जात होता. 
- ही जगातील सर्वात मोठे पर्यावरणीय संकट आहे. 1997 मध्‍ये कोरडा होत चाललेला अरल सागर चार तलावात विभागला गेला होता.
- उत्तर अरल सागर, पूर्व भाग, पश्चिम भाग आणि सर्वात मोठ्या भागाला दक्षिण अरल समुद्र अशी त्यांना नावे देण्‍यात आली होती.
- 2009 पर्यंत समुद्राचा आग्नेय भाग संपूर्ण कोरडा ठक झाला आणि नैर्ऋत्य भाग बारीक पट्टीत रुपांतर झाला आहे. 
- संयुक्त राष्‍ट्राचे महासचिव बान की मून यांनी मध्‍य आशियाच्या नेत्यांबरोबर अराल समुद्राचा दौरा केला होता. पर्यावरणीय संकटाला तोंड देण्‍यासाठी मून यांनी सर्वांना आवाहन केले होते.
 
समुद्र कोरडा पडण्‍याचा परिणाम-
 
- समुद्र आटल्याने सर्वात जास्त परिणाम येथील समृध्‍द मासेमारी व्यवसायावर झाला. मासेमारी व्यवसाय पूर्णपणे संपला. 
- यामुळे बेरोजगारी आणि आर्थिक संकटांचा क्रम सुरु झाला. आटल्याने प्रदूषण वाढले आहे आणि अरल समुद्राच्या परिक्षेत्रात राहणा-या लोकांच्या आरोग्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. 
-हवामानावरही याचा खूप परिणाम झाला आहे. उन्हाळा असो हिवाळा दोन्हींचा कहर सुरु झाला आहे.
 
का आटला समुद्र-
 
- अरल समुद्राच्या आटण्‍याची प्रक्रिया सोव्हिएत संघाच्या एका प्रकल्पाने झाला. 1960 मध्‍ये सोव्हिएत संघाच्या सिंचन प्रकल्पासाठी नद्यांचा प्रवाह बदलण्‍या आला होता. 
- यानंतर हा समुद्र आटायला लागला. हे संकट दूर करण्‍यासाठी कझाकिस्तानने 2005 मध्‍ये एक धरण बांधले होते. 
- याने 2008 मध्‍ये समुद्रातील पाण्‍याची पातळी वाढली. असे असूनही अराल समुद्राची स्थितीत बदल झाला नाही.
 
पुढील स्लाईड्सवर पाहा, अरल समुद्राच्या बिकट स्थितीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...