आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुर्कीची पाक इंटरनॅशनल स्कूल बंद करण्याची सूचना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तुर्कीने अयशस्वी विद्रोहानंतर आता पाकिस्तानला सांगितले की, त्यांनी आपल्या येथील पाक तुर्क इंटरनॅशनल स्कूल बंद करावे. त्यांचा आरोप हा आहे की, शाळा-महाविद्यालये ही तुर्की विद्रोहातील दोषी फतुल्लाह गुलेन च्या निर्देशानुसार चालत आहेत. मात्र पाकीस्तानने या शाळा -महाविद्यालये बंद करण्यास सध्यातरी मनाई केली आहे. आणी या शाळांची चौकशी करण्याचे आश्वासन तुर्कीला दिले आहे.

तुर्कीचे परराष्ट्रमंत्री मेवलत कावूसोग्लू मंगळवारी इस्लामाबादमध्ये होते. त्यांनी पंतप्रधान नवाझ शरीफ यांचे परराष्ट्र प्रकरणातील सल्लागार सरताज अजीझ यांची भेट घेतली. तुर्की एक मोहीम चालवून जगभरातील फतुल्लाह गुलेन याच्या संघटनेशी संबंधीत शिक्षणसंस्था बंद करवत आहे. सरताज अजीझ यांनी कावूसोग्लू यांना विद्रोहावर नियंत्रण ठेवण्यासाठी धन्यवाद दिले यासह त्यांना शाळांची चौकशीचे आश्वासन देतील.

१६० देशात आहे गुलेनच्या संस्था
अमेरीकेत वास्तव्यास असलेल्या इस्लामी धर्मगुरु फतुल्लाह गुलेनचे हे संघटन इजमत १६० देशात शिक्षणसंस्था चालवतात. याची संख्या जवळपास २००० एव्हढी आहे.

पाकिस्तानात शिकताहेत दहा हजार विद्यार्थी
पाकमधील पाकतुर्क इंटरनॅशनल स्कुल आणि महाविद्यालये साधारणत: २१ वर्षापासून चालत आहेत. यात जवळपास दहा हजार विद्यार्थी शिकत आहेत. पाक सरकारचे म्हणणे आहे की, या संस्था कोणत्याही धार्मिक वा राजकारणी संघटनेशी संबंधीत नाहीतच. तथापी तुर्कीचे म्हणणे आहे की, ह्या संस्था एर्दोगन विरोधी फतुल्लाह गुलेनशी संबंधीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...