आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहा तालिबानी कमांडर पाकिस्तानमध्ये शरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इस्लामाबाद - तालिबानचे सहा वरिष्ठ कमांडर तसेच ३० दहशतवाद्यांनी शनिवारी रात्री पाकिस्तानच्या सुरक्षा दलांसमोर शरणागती पत्करली. त्यात तालिबानचा माजी प्रमुख हकिमुल्ला मेहसूदचा भाऊ फैज महसूद आणि काका खैर मुहम्मद मेहसूद यांचा समावेश आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

अफगाणिस्तानमधून परतल्यानंतर या बंडखोरांनी शनिवारी रात्री शरणागती पत्करली. हे सर्व सहा कमांडर सुरक्षा दलांच्या ताब्यात असून त्यांची चौकशी केली जात आहे. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानी लष्कराने उत्तर वजिरीस्तानात २०१४ मध्ये मोठ्या प्रमाणावर कारवाई केली होती.

या कारवाईत ३५०० पेक्षा जास्त दहशतवादी ठार झाले होते. त्या वेळी हे दहशतवादी अफगाणिस्तानमध्ये पळून गेले होते. अफगाणिस्तानमधून परत आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. शरण आलेल्या या सर्व दहशतवाद्यांना आता तुल भागातील सुरक्षा दलांच्या शिबिरात हलवण्यात आले आहे.
बातम्या आणखी आहेत...